विश्व चॅम्पियनशिप, आशियाडमध्ये ‘सुवर्ण लक्ष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:24 AM2018-07-26T01:24:08+5:302018-07-26T01:24:24+5:30

पी. व्ही. सिंधू चीनमधील विश्व चॅम्पियनशिप आणि जकार्ता येथील आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

World championship, 'gold target' in Asia | विश्व चॅम्पियनशिप, आशियाडमध्ये ‘सुवर्ण लक्ष्य’

विश्व चॅम्पियनशिप, आशियाडमध्ये ‘सुवर्ण लक्ष्य’

Next

नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात सलग तीनवेळा अंतिम फेरी गाठली; पण तिन्हीवेळा जेतेपद पटकविण्यात अपयशी ठरलेली आॅलिम्पिक रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू चीनमधील विश्व चॅम्पियनशिप आणि जकार्ता येथील आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यापासून सिंधू जबर फॉर्ममध्ये आहे. गतषवर्षी तिने सहा फायनलची अंतिम फेरी गाठली व त्यात तीनदा जेतेपद पटकाविले. यंदा इंडिया ओपन, राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा आणि थायलंड ओपनमध्ये सिंधू पराभूत होताच तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
यावर ती म्हणते, ‘गेल्या काही महिन्यांत मी फायनलमध्ये सातत्याने पराभूत होत आहे. यामागे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू असतात. तुम्ही चांगले खेळत आहात, पण अखेरचा अडथळा पार करणे कठीण का होते, याचा विचार करावा लागेल.’ सिंधू ३० जुलै रोजी चीनमध्ये सुरू होत असलेल्या विश्व चॅम्पियनशिपसाठी शनिवारी रवाना होणार आहे.
विश्व आणि आशियाडमध्ये सुवर्ण जिंकणे हे आपले लक्ष्य असल्याचे सांगून सिंधू म्हणाली, ‘आशियाडमध्ये मारिन वगळता सर्वच दिग्गजांची उपस्थिती राहणार असल्याने प्रत्येक सामना अंतिम सामना असेल. विश्व चॅम्पियनशिपचा ड्रॉ देखील कठीण असल्याने
कुठलाही सामना सहजसोपा नसेल.’ 

Web Title: World championship, 'gold target' in Asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.