जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:02 AM2018-04-19T02:02:14+5:302018-04-19T02:02:14+5:30
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आणि भारतीय शालेय क्रीडा खेळ महासंघ व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन शुक्रवार ते मंगळवारदरम्यान (दि २० ते २४) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात येणार आहे.
पुणे : महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आणि भारतीय शालेय क्रीडा खेळ महासंघ व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन शुक्रवार ते मंगळवारदरम्यान (दि २० ते २४) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १८ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात होणार असल्याची माहिती राज्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोपल म्हणाले, ‘‘या स्पर्धेत भारताच्या अ व ब संघांसह तुर्की, यूएई, क्रोएशिया, बेल्जियम, बल्गेरिया, ब्राझील, चायनीज तैपेई, फ्रान्स, चीन, इंग्लंड, ग्रीस, झेक रिपब्लिक, जॉर्जिया, इटली असे १६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक देशाच्या संघात ५ मुली, ५ मुले असे एकूण १० खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये २०० खेळाडू, ६४ प्रशिक्षक, ३२ व्यवस्थापक, ८० पंच व तांत्रिक अधिकारी यांचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २०) सकाळी १० वाजता होणार आहे. स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि. २४) होईल. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.’’
आंतरराष्टÑीय पंच व स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी उदय साने म्हणाले, की स्पर्धेत एकूण ७६ साखळी सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर सामने सुरू होतील.