Youth Olympics 2018: लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक, भारताचे आणखी एक पदक निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 05:03 PM2018-10-12T17:03:41+5:302018-10-12T17:04:01+5:30
Youth Olympics 2018: भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.
ब्युनोस आयरिस : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने पिछाडीवरून मुसंडी मारताना जपानच्या कोडाई नाराओकाला पराभूत केले.
लक्ष्यने पहिला गेम 14-21 असा गमावला, परंतु त्याने पुढील गेममध्ये 21-15 असा विजय मिळवून सामना निर्णायक गेममध्ये नेला. निर्णयाक गेममध्ये दोन्ही खेळाडूंकडून चुरशीचा खेळ झाला. मात्र लक्ष्यने 24-22 अशी बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला.
Lakshya to go for Gold!
— SAIMedia (@Media_SAI) October 12, 2018
Our young #Badminton champ #TOPSAthlete@lakshya_sen came from a set down to beat Japan’s Kodai Naraoka to reach men’s Singles final at @BuenosAires2018.He’ll play his final later tonight.Wishing him good luck! #GoForGold#IndiaAtYOG@BAI_Media#KheloIndiapic.twitter.com/KSFsaHq5Tb
जेतेपदासाठी त्याला चीनच्या ली शिफेंगचा सामना करावा लागणार आहे. अंतिम सामन्यात लक्ष्यने विजय मिळवल्यास तो युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला बॅडमिंटनपटू ठरेल. 2010 च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत प्रणॉय कुमारने रौप्यपदक जिंकले होते.
1⃣step away from creating history! 🎯@lakshya_sen was down 1st game only to bounce back & take the match14-21;21-15,24-22 against 🇯🇵's Naraoka Kodai in the SF match of #YouthOlympics. Will play Li Shifeng from🇨🇳 in the final,later tonight.Get the🥇home.#IndiaontheRisepic.twitter.com/8gXY01pucZ
— BAI Media (@BAI_Media) October 12, 2018