...अन् बास्केटबॉल कोर्टवर फ्री स्टाईल राडा; ऑस्ट्रेलिया-फिलिपाईन्स संघाचे खेळाडू भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 21:53 IST2018-07-04T21:52:53+5:302018-07-04T21:53:52+5:30
ऑस्ट्रेलिया आणि फिलिपाईन्स यांच्यातील बास्केटबॉल सामन्यात खेळाडू एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

...अन् बास्केटबॉल कोर्टवर फ्री स्टाईल राडा; ऑस्ट्रेलिया-फिलिपाईन्स संघाचे खेळाडू भिडले
ऑस्टे्लिया - खिलाडूवृत्ती हा कोणत्याही खेळाचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाला एक शिस्त लागते. पण हा कणा ढासळतो तेव्हा काय होऊ शकते, याची प्रचिती ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एका स्पर्धेत आली. बास्केटबॉल विश्वचषक पात्रता स्पर्धेत चक्क फ्री स्टाईल राडा झालेला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया आणि फिलिपाईन्स यांच्यातील बास्केटबॉल सामन्यात खेळाडू एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात खेळाडू एकमेकांना लाथामुक्क्यांनी मारत असल्याचे आणि खुर्च्या फेकत असल्याचे पाहुन हा बास्केटबॉलचा सामना आहे की फ्री स्टाईल मारामारी आहे, हेच कळेनासे झाले होते.
नेमके काय घडले, पाहा हा व्हिडिओ...
Wow, unbelievable violence on the #basketball court, Filipino players attacking Australia players in World Cup qualifying. Disgusting. pic.twitter.com/M6OUQr9NGo
— Ryan Northover (@RyanNorthover) July 2, 2018
या सगळ्या हाणामारीनंतर फिलिपाईन्सच्या नऊ खेळाडूंना, तर ऑस्ट्रेलियाच्या आठ खेळाडूंना बसवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने 89-53 अशा फरकाने ही लढत जिंकली. तिस-या सत्रानंतर ऑस्ट्रेलिया 79-48 अशा आघाडीवर असताना ही हाणामारी झाली.