जॉर्डनच्या बुटांना मिळाली ५ लाख ६० हजार डॉलरची किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:04 AM2020-05-19T05:04:59+5:302020-05-19T05:05:21+5:30
बास्केटबॉलमधील बुटांसाठी ही विक्रमी किंमत आहे. पांढऱ्या, काळ्या व लाल रंगाचे हे बूट मायकल जॉर्डनसाठी १९८५ मध्ये तयार करण्यात आले होते. त्याची या बुटांवर स्वाक्षरी आहे.
न्यूयॉर्क : महान बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनने सामन्यादरम्यान घातलेले ‘एअर जॉर्डन’ बूट सोथबी लिलावगृहात झालेल्या लिलावामध्ये ५ लाख ६० हजार डॉलरला विकल्या गेले.
बास्केटबॉलमधील बुटांसाठी ही विक्रमी किंमत आहे. पांढऱ्या, काळ्या व लाल रंगाचे हे बूट मायकल जॉर्डनसाठी १९८५ मध्ये तयार करण्यात आले होते. त्याची या बुटांवर स्वाक्षरी आहे.
जॉर्डनच्या बुटांनी ‘मून श्ूा’चा विक्रम मोडला. सोथबीच्या जुलै २०१९ मध्ये झालेल्या लिलावामध्ये ‘मून शू’साठी चार लाख ३७ हजार डॉलर किंमत मिळाली होती.
सोथबीला हे बूट एक ते दीड लाख डॉलरला विकल्या जाण्याची आशा होती, पण लिलावादरम्यान बुटांसाठी त्यापेक्षा अधिक बोली लागली. एअर जॉर्डन वन बुटांचे पहिले मॉडल होते. ते विशेषत: मायकल जॉर्डनसाठी तयार करण्यात आले होते, हे विशेष. मायकल जॉर्डनने हे बूट एनबीएच्या आपल्या पहिल्या सत्रादरम्यान वापरले होते. (वृत्तसंस्था)