राष्ट्रीय बास्केटबॉल : महाराष्ट्राच्या पदरी निराशा, पुरुष व महिला संघांचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:23 AM2018-01-19T02:23:33+5:302018-01-19T02:23:44+5:30
पुरुष व महिला संघांना अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि रेल्वेविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागल्याने ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला
ललित नहाटा
चेन्नई : पुरुष व महिला संघांना अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि रेल्वेविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागल्याने ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला. महाराष्ट्राच्या पुरुषांचा पश्चिम बंगालविरुद्ध ४९-५४ असा, तर महिलांचा रेल्वेविरुद्ध ४७-९८ असा मोठा पराभव झाला.
येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत विजयी सलामी दिलेल्या महाराष्ट्राच्या पुरुषांना पश्चिम बंगालविरुद्ध कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. सावध सुरुवात केल्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये महाराष्ट्र संघ १०-१२ असा थोडक्यात पिछाडीवर राहिला. अमित गहलोत याने महाराष्ट्राकडून चांगली कामगिरी केली. पश्चिम बंगालच्या उंचपुºया खेळाडूंनी आपल्या उंचीचा फायदा घेत दुसºया क्वार्टरमध्ये १२ गुणांची आघाडी मिळवत मध्यंतराला २९-१७ असे वर्चस्व मिळवले.
दुसºया सत्रात महाराष्ट्राने पुनरागमनाचे चांगले प्रयत्न केले. राकेशने एकट्याने ७ गुणांची कमाई केली, मात्र तरीही बंगाल संघाने ४१-३३ अशी आघाडी कायम राखली. यावेळी पिछाडी कमी करण्याचेच समाधान महाराष्ट्राला मिळाले. चौथ्या व निर्णायक क्वार्टमध्येही महाराष्ट्राने झुंजार खेळ केला. परंतु, मोक्याच्यावेळी झालेल्या चुकांचा फटका बसल्याने अखेर पश्चिम बंगालने ५४-४९ अशी बाजी मारत महाराष्ट्राला पराभवाचा धक्का दिला.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चांगली सुरुवात करून रेल्वेला कडवी टक्कर दिलेल्या महाराष्ट्राला पहिल्या क्वार्टरमध्ये माफक चुकांचा फटका बसला. या जोरावर रेल्वेने सलग तीन गुणांची कमाई करत जोर पकडला व २७-१४ अशी भक्कम आघाडी घेतली.
यानंतर रेल्वेने अधिक जोरदार खेळ करत मध्यंतराला ५२-२१ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. मुग्धा अमराओतकर हिने १०, तर शिरीन लिमये व श्रुती शेरिगर यांनी प्रत्येकी
९ गुणांची कमाई करत रेल्वेला
टक्कर देण्याचा अपयशी प्रयत्न
केला. रेल्वेने अखेर ७६-३१ अशी भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर शिक्कामोर्तब केले.