राष्ट्रीय बास्केटबॉल :महाराष्ट्राच्या महिलांचे आव्हान संपुष्टात, छत्तीसगडकडून पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:55 AM2018-01-23T01:55:15+5:302018-01-23T01:55:24+5:30

छत्तीसगडविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाला ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. सांघिक खेळाचा अभाव दिसल्याने महाराष्ट्राचा छत्तीसगडविरुद्ध ६१-९० असा पराभव झाला.

 National Basketball: Due to the challenge of women in Maharashtra, defeating Chhattisgarh | राष्ट्रीय बास्केटबॉल :महाराष्ट्राच्या महिलांचे आव्हान संपुष्टात, छत्तीसगडकडून पराभव

राष्ट्रीय बास्केटबॉल :महाराष्ट्राच्या महिलांचे आव्हान संपुष्टात, छत्तीसगडकडून पराभव

Next

ललित नहाटा
चेन्नई : छत्तीसगडविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाला ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. सांघिक खेळाचा अभाव दिसल्याने महाराष्ट्राचा छत्तीसगडविरुद्ध ६१-९० असा पराभव झाला.
येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात छत्तीसगडने आक्रमक सुरुवात करताना महाराष्ट्रावर अखेरपर्यंत दबाव राखले. पहिल्या ५ मिनिटांमध्येच त्यांनी १५-६ अशी मोठी आघाडी मिळवत घट्ट पकड मिळवली. ७ फूट उंच असलेल्या पूनम चतुर्वेदी, अंजू लाक्रा आणि संगीता कौर या त्रिकूटाच्या जोरावर छत्तीसगडने पहिल्या क्वार्टरमध्ये २६-१० अशी एकतर्फी आघाडी घेतली.
यानंतर आणखी वेगवान खेळ करताना छत्तीसगडने महाराष्ट्रावर कमालीचे दडपण आणले. महाराष्ट्राच्या महिलांनीही पुनरागमनाचा चांगला प्रयत्न केला; परंतु छत्तीसगडच्या वेगवान खेळापुढे त्यांचा निभाव लागला नाही. छत्तीसगडने मध्यंतराला ४२-२६ अशी भक्कम आघाडी मिळवली.
तिसºया क्वार्टरमध्ये महाराष्ट्राने कडवी टक्कर दिली. या वेळी महाराष्ट्र पुनरागमन करणार अशीच शक्यता होती. परंतु सदोष नेमबाजीचा फटका बसल्याने तिसºया क्वार्टरमध्येही छत्तीसगडचे ६५-५४ असे वर्चस्व राहिले. अखेरच्या क्वार्टरमध्येही छत्तीसगडने चेंडूवर अधिक वेळ ताबा राखताना महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवत अखेर ९०-६१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राकडून कॅरिना मेनेझेस हिने सर्वाधिक १८ गुण मिळवले.

Web Title:  National Basketball: Due to the challenge of women in Maharashtra, defeating Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.