केसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:45 AM2018-09-24T11:45:11+5:302018-09-24T11:46:15+5:30
केसातील कोंड्याच्या समस्येने प्रत्येक दुसरा व्यक्ती हैराण आहे. अनेकदा योग्य शॅम्पूचा वापर करुन कोंडा दूर केला जाऊ शकतो. पण कधी कधी अनेक उपाय करुनही केसांतील कोंडा दूर होत नाही.
केसातील कोंड्याच्या समस्येने प्रत्येक दुसरा व्यक्ती हैराण आहे. अनेकदा योग्य शॅम्पूचा वापर करुन कोंडा दूर केला जाऊ शकतो. पण कधी कधी अनेक उपाय करुनही केसांतील कोंडा दूर होत नाही. तुम्हालाही ही समस्या असेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. मेहंदीच्या काही हेअर पॅकने तुमची ही समस्या दूर होऊ शकते.
१) मेहंदीमध्ये लिंबू, योगर्ट
बाजारातून फ्रेश मेहंदी घेऊन किंवा मेहंदी पाने सुकवून त्याची पावडर करा. बाजारात मिळणारी केमिकल्स युक्त मेहंदी पावडरची वापर न केल्यास योग्य होईल. एका वाटीमध्ये ४ चमचे मेहंदी पावडर, एका लिंबाचा रस आणि गरज असेल तर योगर्ट टाका. आता हेअर हा हेअर पॅक केसांच्या मुळापासून लावा. ३० मिनिटे हा पॅक तसाच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने केस धूवा. त्यानंतर कमी केमिकल असलेल्या शॅम्पूने केस धूवा.
२) मेहंदीमध्ये ऑलिव ऑइल आणि मेथी दाणे
एका वाटीमध्ये ४ चमचे मेहंदी पावडर, एका लिंबाचा रस, एक चमचा ऑलिव ऑइल, एक चमचा मेथीच्या दाण्यांचं पावडर आणि शेवटी योगर्ट टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी हे केसांवर लावा. मेहंदी सुकल्यावर केस धुवा.
३) मेहंदी आणि अंड
एका वाटीमध्ये ३ चमचे मेहंदी पावडर, एक चमचा ऑलिव ऑइल २ अंडे आणि गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण तयार करताना ही काळजी घ्या की, मेहंदी अंड्यामुळे घट्ट होऊ नये. हा हेअर पॅक डोक्याची त्वता आणि केसांवर लावा. हा हेअर पॅक सुकल्यानंतर शॅम्पूने केस धुवा.