ओठांच्या काळ्या रंगामुळे चेहऱ्याचं सौंदर्य लपलंय का? 'हे' उपाय ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:19 PM2018-08-23T13:19:30+5:302018-08-23T13:23:47+5:30
स्किन केअर म्हटलं की, प्रत्येकाचं लक्ष आपल्या चेहऱ्याच्या त्वचेकडे जातं. चेहऱ्यावरील पिम्पल्स, डार्क सर्कल्स, सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करण्यास सुरूवात करतो.
स्किन केअर म्हटलं की, प्रत्येकाचं लक्ष आपल्या चेहऱ्याच्या त्वचेकडे जातं. चेहऱ्यावरील पिम्पल्स, डार्क सर्कल्स, सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करण्यास सुरूवात करतो. पण त्यातील फार कमी लोकं अशी असतात, जे आपल्या ओठांकडे लक्ष देतात. ओठांची आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यात फार महत्त्वाची भूमिका असते. पण अनेकदा आपण ओठांकडे दुर्लक्ष करतो. ओठांची त्वचा ही शरीराच्या त्वचेपेक्षा फार सेंन्सेटिव्ह असते.
आपल्या ओठांची त्वचा जास्त सेंन्सिटिव्ह असल्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे तिच्यावर लगेच परिणाम होतो. ओठ फाटणं, काळे पडणं ही त्याचीच लक्षणं आहेत. याव्यतिरिक्त सूर्यांची किरणं, धुम्रपान आणि जास्त कॉफी किंवा चहाचं सेवन केल्यानं ओठ काळे पडतात. रक्ताची कमतरता, डर्मेटायटिस यांसारख्या आजारांमुळेही ओठ काळे पडतात. पण जर नैसर्गिक कारणांमुळे तुमचे ओठ काळे पडत असतील तर 3 घरगुती उपायांनी तुम्ही ओठांचा मूळ रंग परत मिळवू शकता.
1. लिंबाचा रस
एका बाऊलमध्ये लिंबाचा रस घ्या. कॉटन बॉलच्या सहाय्याने ओठांवर लावा आणि कमीत कमी 15 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पाण्याने ओठ धुवून टाका. लिंबामध्ये नॅचरल ब्लीचिंग गुमधर्म असतात. जे काही दिवसांत ओठांचा काळा रंग घालवण्यास मदत करतील.
2. ऑलिव ऑइल
रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव ऑइल ओठांवर लावा. कमीत कमी 5 मिनिटांपर्यंत मसाज करा. असे 15 जदिवसांपर्यंत केल्याने ओठांचा काळेपणा दूर होईल.
3. मिल्क क्रीम
एक चमचा मलईमध्ये एक चमचा साखर मिक्स करा. त्यानंतर ओठांवर 5 मिनिटं मसाज करा. असं आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा करा. थोडे दिवसांनी ओठांच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.