केसांना तेल लावायचं नसेल तर मजबूत आणि चमकदार केसांसाठी ४ खास उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:38 AM2019-06-25T11:38:59+5:302019-06-25T11:46:39+5:30
हेअर ऑइलबाबत वेगवेगळे प्रश्न लोकांच्या मनात राहतात. कोणतं हेअर ऑइल कोणत्या वेळी लावायचं? मजबूत केसांसाठी कोणतं हेअर ऑइल लावावं?
(Image Credit : FirstCry Parentin)
हेअर ऑइलबाबत वेगवेगळे प्रश्न लोकांच्या मनात राहतात. कोणतं हेअर ऑइल कोणत्या वेळी लावायचं? मजबूत केसांसाठी कोणतं हेअर ऑइल लावावं? कोंडा जावा म्हणून कोणतं हेअर ऑइल वापरावं? असे कितीतरी प्रश्न अनेकांना पडत राहतात. केसांच्या पोषणासाठी हेअर ऑइल फार महत्त्वाचं असतं. चला जाणून घेऊ हेअर ऑइलचं महत्त्व आणि काही वैज्ञानिक तथ्य....
हेअर ऑइल का असतं खास
हेअर ऑइलमुळे केसांना चमक येते आणि प्रत्येकालाच केसांना चमक हवी असते. पण काही लोकांना केसांना तेल लावणं आवडत नाही. कोही लोकांना ऑफिसमध्ये किंवा पार्टीमध्ये केसांना तेल लावून जाणं पसंत नसतं. जर तुम्हीही असंच करत असाल तर तुम्हाला तुमच्या केसांची चिंता वाटली पाहिजे. कारण तेल लावलं नाही तर केसांवर काही दिवसातच वाईट परिणाम बघायला मिळेल.
(Image Credit : Naturally Daily)
आज आम्ही तुम्हाला केसांना तेल न लावल्याने होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्याचे काही खास उपाय सांगणार आहोत. हे उपाय नैसर्गिक पद्धतीने केसांना पोषण देतात आणि केसांना नवी चमक प्रदान करतात. चला जाणून घेऊ असेच काही खास घरगुती उपाय....
पपई आणि बेसन
हा हेअर मास्क तयार करण्यासाठी पपईचे छोटे छोटे तुकडे करून त्यात बेसन आणि अॅपल व्हिनेगर टाकून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट अर्ध्या तासांसाठी केसांना लावा. याने तुम्हाला चमकदार आणि डॅंड्रफ फ्री केस मिळतील.
हेअर ऑइल नाही तर दही लावा
(Image Credit : Lifestylica)
जर तुम्हाला केसांना तेल लावायचं नसेल तर केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही केस धुण्याआधी डोक्याच्या त्वचेवर दही लावा आणि अर्ध्या तासाने केस शॅम्पूने धुवावे. याने तुम्हाला नंतर कंडीशनिंग करण्याचीही गरज पडणार नाही.
लिंबाचा रस आणि केळं
(Image Credit : Organic Facts)
हा उपाय करण्यासाठी एक पिकलेलं केळं स्मॅश करून त्यात २ चमचे लिंबाचा रस मिश्रित करा. नंतर केसांना हे मिश्रण २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने चांगले स्वच्छ करा.
अंडी आणि कच्च दूध
(Image Credit : KXRB 1140 AM/100.1 FM)
अंड कच्च्या दुधात मिश्रित करुन घट्टा होईपर्यंत फेटा. ही पेस्ट नंतर १ तासांपर्यंत केसांना लावून ठेवा. नंतर केस शॅम्पूने धुवावे. याने केस चमकदार होतील.
ग्लिसरीन आणि अॅलोवेरा जेल
जर तुमच्या केसांना दोन तोंड असण्याची समस्या असेल तर अंड्याचा पिवळ्या भागात ३ चमचे ग्लिसरीन आणि १ चमचा अॅलोवेरा जेल चांगल्याप्रकारे मिश्रित करा. ही पेस्ट केसांना अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस धुवावे.