चेहऱ्याची त्वचा लूज झालीये? करा हे सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 10:54 AM2018-10-20T10:54:12+5:302018-10-20T10:55:30+5:30
एका वयानंतर चेहऱ्याच्या त्वचेचा टाईटनेस कमी होऊ लागतो. टाईटनेस कमी होणे म्हणजे चेहऱ्याची चमक कमी होणार.
एका वयानंतर चेहऱ्याच्या त्वचेचा टाईटनेस कमी होऊ लागतो. टाईटनेस कमी होणे म्हणजे चेहऱ्याची चमक कमी होणार. जर तुमचीही चेहऱ्याची त्वचा लूज झाली असेल किंवा त्याची टाईटनेस कमी झाली असेल काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी लाइफस्टाईल आणि आहारावर खास लक्ष द्यावं लागतं. चेहऱ्याची सुंदरता त्वचेच्या टाईटनेसवर अवलंबून असते. सामान्यपणे हे पाहिलं जातं की, वयाच्या ३० व्या वर्षांनंतर चेहऱ्याची टाईटनेस कमी होऊ लागते. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमच्या चेहऱ्याची टाईटनेस कायम राहिल.
पाणी
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जितकं पाणी गरजेचं आहे तितकंच ते त्वचा ताजी दिसण्यासाठीही महत्त्वाचं आहे. जे लोक पाणी कमी पितात त्यांची त्वचा कोरडी होते. दिवसातून कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं.
व्यायाम
(Image Credit : Healthista)
प्रत्येक व्यक्तीला हेल्दी आणि फिट राहण्यासाठी नियमीतपणे एक्सरसाईज करणे गरजेचे आहे. ३० वय ओलांडल्यावर एक्सरसाईज हेल्थसाठी गरजेची आहे. याने फिटनेससोबतच त्वचेची टाईटनेसही कायम राहते.
मसाज
त्वचेच्या टाईटनेससाठी मसाज करणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. चेहऱ्याची मसाज केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक रंग उजळतो. मसाजसाठी अनेकप्रकारचे फेसपॅक आज बाजारात उपलब्ध आहेत. पण नैसर्गिक वस्तूंचा वापर केल्यास चेहरा आणखी चांगला राहतो.
अॅस्ट्रिजेंटचा वापर
स्किन टोनरप्रमाणे अॅस्ट्रिजेंट सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर आहे. बाजारात हे सहजपणे उपलब्ध होतं. याचा वापर केल्याने त्वचेची टाईटनेस कायम राहते.