दात पांढरे शुभ्र आणि चमकदार करण्यासाठी करा ही ४ कामे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:06 AM2018-08-23T11:06:54+5:302018-08-23T11:07:14+5:30
दातांवरील डाग आणि पिवळेपणा तुमच्या चांदीसारख्या स्माईलला ग्रहण लावते. त्यामुळे आम्ही तुम्हाला दाच चमकदार करण्याच्या काही सोप्या आणि खास टिप्स सांगणार आहोत.
चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यात तुमची स्माईल सर्वात महत्वाची भूमिका बजावते. पण जर तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार नसतील तर ही स्माईल आणखीन जास्त प्रभावी ठरते. दातांवरील डाग आणि पिवळेपणा तुमच्या चांदीसारख्या स्माईलला ग्रहण लावते. त्यामुळे आम्ही तुम्हाला दाच चमकदार करण्याच्या काही सोप्या आणि खास टिप्स सांगणार आहोत.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा दात चमकवण्यासाठीचा नैसर्गिक उपाय आहे. हे एकप्रकारचं ब्लीच आहे. जे दात सहजपणे स्वच्छ करतं. दात बेकिंग सोड्याने एक आठवडा साफ करा याने दातांची चमक वाढेल.
ऑयल पुलिंग
ऑयल पुलिंगमुळे दात चमकदार होण्यासोबतच तोंडातील बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ नष्ट होतील. सोबतच याने कॅव्हिटी, तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्याही दूर करतं.
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल साइडर व्हिनेगर ने तुमचे दात चमकवण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. एक कप पाण्यामध्ये अर्धा चमचा अॅपलची साल घ्या आणि ब्रशच्या सहायाने दात स्वच्छ करा. दातांवरील डाग दूर होईपर्यंत हळूहळू दातांवर चमक येईल. पण याचा जास्त वापर करु नये.
फळ आणि भाज्या
पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी दातांवरील डाग आणि घाण दूर करण्यासाठी मदत करतात. स्ट्रॉबेरी आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण तयार करुन एका आठवडा त्याने ब्रश करा. याने दातांचा पिवळेपणा दूर होईल. तसेच वेगवेगळ्या भाज्यांनीही दात मजबूत होतात.