थंडीच्या दिवसात केसगळतीने हैराण आहात? करा हे ५ घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 11:41 AM2018-11-21T11:41:30+5:302018-11-21T11:45:37+5:30

थंडीच्या दिवसात केवळ त्वचेच्या समस्या जास्त डोकं वर काढतात असं नाही तर  केसगळती ही समस्या थंडीच्या दिवसात अनेकांना अधिक हैराण करते.

5 amazing herbs for hair growth in winter | थंडीच्या दिवसात केसगळतीने हैराण आहात? करा हे ५ घरगुती उपाय

थंडीच्या दिवसात केसगळतीने हैराण आहात? करा हे ५ घरगुती उपाय

googlenewsNext

थंडीच्या दिवसात केवळ त्वचेच्या समस्या जास्त डोकं वर काढतात असं नाही तर  केसगळती ही समस्या थंडीच्या दिवसात अनेकांना अधिक हैराण करते. त्यामुळे या दिवसात केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. जर थंडीच्या दिवसात केसांची चांगली काळजी योग्यप्रकारे घेतली गेली तर केसांची वाढही चांगली होते. मजबूत आणि दाट केस मिळवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय केल्यास थंडीच्या दिवसात अधिक फायदा होतो. खालील काही उपाय तुम्ही ट्राय केलेत तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

कडूलिंब - थंडीच्या दिवसात केसांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. केसगळती तसेच केस रखरखीत होणे या समस्या अधिक होतात. तर तुम्हालाही या समस्या होत असतील तर कडूलिंबाच्या पानांचा वापर करु शकता. कडूलिंबाच्या पानांमध्ये एनल्जेसिक, अॅंटी-इफ्लेंटरी गुण असतात जे केसांची कोणतीही समस्या दूर करतात. कडूलिंबाची पाने बारीक करुन ही पेस्ट केसांवर लावू शकता. 

लॅवेंडर - लॅवेंडरमध्ये अॅंटी-इंफ्लेमेट्री आणि अॅंटी-मायक्रोबियल गुण असतात, जे केसगळती थांबवण्यासाठी मदत करतात. तसेच केस मजबूत होण्यासही मदत होते. यात अंटी-रेपेलेंट गुण असतात, जे केसांमध्ये होणाऱ्या उवा नष्ट करण्यात मदत करतात. तसेच या तेलाने केसांची वाढही चांगली होते. 

आवळा - आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. हे कोलेजन निर्मितीसाठी फायदेशीर असतात. कोलेजन केसांची वाढ आणि विकास सुनिश्चित करतो. आवळ्याची पावडर पाण्यात मिश्रित करुन केसांच्या मुळात लावा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने केस धुवा. 

मेथी - मेथी एकप्रकारे नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. यात अंटी-फंगल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात. यांच्या मदतीने केसांचा विकास चांगला होतो. मेथी, आवळा, शिकेकाई आणि हिना याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळात लावा आणि अर्धा तास केस तसेच ठेवा. त्यानंतर केस धुवा.

मेहंदी - मेहंदीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटीमायक्रोबियल आणि अॅस्ट्रिजेंट गुण असतात. या गुणांमुळे केस चांगले राहतात. याने केस लांब होण्यासही मदत होते. याने केसांच्या मुळात असलेलं जास्त तेल दूर केलं जातं. मेहंदी पावडर आणि पाणी मिश्रित करुन अर्धा तास केसांना लावून ठेवा. नंतर केस पाण्याने चांगले धुवा. याने केस मजबूत आणि दाड होतात. 
 

Web Title: 5 amazing herbs for hair growth in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.