या 5 गोष्टींच्या माध्यमातून पावसाळ्यात केसांची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 12:40 PM2018-06-19T12:40:58+5:302018-06-19T12:40:58+5:30
पावसाळ्यात केसांची काळजी घेणे फारच कठीण काम आहे. कारण सतत केस भीजल्याने केस कमजोर होतात. त्यामुळे केसगळतीची समस्या वाढू शकते.
पावसाळ्यात केसांची काळजी घेणे फारच कठीण काम आहे. कारण सतत केस भीजल्याने केस कमजोर होतात. त्यामुळे केसगळतीची समस्या वाढू शकते. अशात या दिवसात केसांची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. आम्ही केसांची योग्यप्रकारे काळजी घेण्याच्या काही खास टिप्स देत आहोत.
1) तेलाने केसांची मसाज
या दिवसात केस काही वेळ चमकदार दिसतात पण वातावरणामुळे पुन्हा केस निर्जीव दिसायला लागतात. त्यामुळे केस धुण्याआधी केसांना तेलाने चांगली मसाज करा. याने केसांना मजबूती मिळेल. काही आठवडे हा उपाय केल्यास केस मजबूत आणि चमकदार होतील.
2) योग्य शॅम्पूची निवड करा
डोक्याची त्वचा ड्राय आहे की तेलकट हे जाणून घेऊनच शॅम्पूची निवड करा. ही माहिती न घेताच कोणतही शॅम्पू वापरल्यास केसगळती होती. तसेच सतत शॅम्पू बदलू नका.
3) योग्यप्रकारे केस धूवा
केस धुण्याच्या पद्धतीवरही केसांची मजबूती अवलंबून असते. केस घाईने धुतल्यास त्यांचे क्यूटिकल्स डॅमेज होतात. महिलांनी आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा केस धुवावे. घाईने किंवा ताकद लावून केस धुतल्यास केस तुटण्याचीही शक्यता असते.
4) हेअर मास्क
पावसाळ्यात केसांसाठी मास्क वापरणे फार गरजेचे आहे. घरीच किंवा पार्लरमध्ये जाऊन तुम्ही हेअर मास्क लावू शकता. आठवड्यातून किमान एका हेअर मास्क लावावं. दह्यात आवळा, दह्यात मध किंवा दह्यात अंड मिश्रित करुन मास्क घरीच तयार करु शकता.
5) केस धुतल्यानंतर असे करु नका
काही लोकांना सवय असते की, केस वाळवण्यासाठी कंगव्याचा वापर करतात तर काही लोक हेअर ड्रायरचाही वापर करतात. असे केल्याने केसांचं नुकसान होतं. तुम्ही कितीही घाईत असाल तरीही केस 10 मिनिटे मोकळ्या हवेत कोरडे होऊ द्या. केस कोरडे झाल्यानंतरच कंगवा किंवा हेअर ड्रायर वापरा.