काजळ लावल्यानंतर पसरत असेल तर उपयोगी ठरतील 'या' 5 टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:50 PM2018-08-09T16:50:43+5:302018-08-09T16:51:33+5:30
डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही काजळ वापरण्यात येतं. सध्या बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काजळ उपलब्ध आहेत. प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये काजळ हे असतचं.
डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही काजळ वापरण्यात येतं. सध्या बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काजळ उपलब्ध आहेत. प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये काजळ हे असतचं. जवळपास सर्वच मुली काजळ रोजच वापरतात. पण जवळपास सर्व मुली काजळाच्या एका गोष्टीनं वैतागलेल्या आहेत. ती गोष्ट म्हणजे, कितीही चांगल्या ब्रँडचं आणि महागडं काजळ घेतलं तरीदेखील ते काही तासांतच पसरतं. त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्कीनवर काळपटपणा दिसून येतो. जर तुम्हाला देखील हा त्रास सहन करावा लागत असेल तर जाणून घेऊयात काही टिप्स ज्यामुळे तुमचं काजळ पसरणार नाही...
1. सर्वातआधी तुम्ही तुमची काजळ लावण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे. तुम्ही काजळ आयलीडच्या आतल्या बाजूला लावत बाहेरच्या बाजूला येता. असं करण्यामुळे डोळ्यांच्या बाहेरच्या कोपऱ्यांवर काजळ जास्त लागतं आणि ते पसरण्यास सुरू होतं. पण जर तुम्ही काजळ बाहेरून आतल्या बाजूला लावलत तर मात्र ते व्यवस्थित लावलं जातं.
2. जर शक्य असेल तर वॉटरफ्रुफ काजळाचा वापर करा. हे कजळ पसरत नाही.
3. काजळ पसरवायचं नसेल तर डोळ्यांच्या दोन्ही आयलीडच्या बाजूला थोडं कॉम्पॅक्ट पावडर लावा. असं केल्यानं काजळ पसरणार नाही.
4. काजळ लावण्याआधी डोळे स्वच्छ करा. डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा तेलकट झाल्यामुळे अनेकदा काजळ पसरतं.
5. काजळाऐवजी आयलायनर लावा. काजळापेक्षा आयलायनर व्यवस्थित लागतं आणि पसरतही नाही. यामुळे डोळ्यांना बोल्ड लूक येतो.