'या' पाच कारणांनी पुरूषांनी त्यांच्या बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, जाणून घ्या फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:09 PM2024-09-07T13:09:29+5:302024-09-07T13:09:55+5:30
Alum Benefits : तुरटीचे त्वचेला अनेक फायदे होतात. त्यामुळेच पुरूषांनी कोणत्या ५ कारणांसाठी तुरटी त्यांच्या बाथरूममध्ये ठेवावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Alum Benefits : तुम्ही जर ८० किंवा ९० च्या काळातील जन्मलेले असाल तर तुम्हाला आठवत असेल की, न्हाव्याकडे दाढी केल्यानंतर तो तुमच्या चेहऱ्यावर तुरटी फिरवत होता. कारण त्यावेळी आफ्टर शेव क्रिम किंवा जेल तेवढे मिळत नव्हते. तुरटीने चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच सोबतच याने सुरकुत्या आणि त्वचेवरील डागही दूर होतात. तुम्ही जर महानगरामध्ये राहणारे असाल तर तुम्हाला याची काहीच कल्पना नसेल. तुरटीचे त्वचेला अनेक फायदे होतात. त्यामुळेच पुरूषांनी कोणत्या ५ कारणांसाठी तुरटी त्यांच्या बाथरूममध्ये ठेवावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुरटीचे फायदे
नॅचरल आफ्टर शेव
शेविंग केल्यानंतर तुम्ही तुरटीचा वापर आफ्टर शेव म्हणून करू शकता. दाढी करताना झालेली जखम याने लगेच भरून निघते आणि त्वचाही चांगली होते.
नॅचरल टोनर, सूज कमी करतं
तुरटी त्वचेला टोन करण्याचं काम करते. याने त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे चेहराही स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागतो. बाजारातील केमिकल्सयुक्त टोनरचा वापर करण्याऐवजी तुरटी कधीही बेस्ट ठरते. कारण याने काहीच साइड इफेक्ट्स होत नाहीत. तसेच याने चेहऱ्यावरील सूज आणि पुरळही दूर होते.
तोंडातील फोडंही दूर होतात
माऊथ अल्सर म्हणजे अनेकदा लोकांना तोंडात फोडं येतात. ही फोडं दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. फोडावर तुरटीचं थोडं पावडर काही सेकंदासाठी लावून ठेवा, नंतर पाण्याने गुरळा करा. दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यावर तुम्हाला आराम मिळेल.
तोंडाची दुर्गंधी
तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना असते. अशात चिमुटभर तुरटी पावडर आणि काळं मीठ एक ग्लास पाण्यात टाका. या पाण्याने दिवसातून दोन वेळा गुरळा करा. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होईल.
डार्क सर्कल
झोप पूर्ण न झाल्याने अनेकदा डोळ्यांखाली काळे डाग दिसतात. हे डाग दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यासाठी थोडं तुरटी पावडर पाण्यात मिक्स करू डागांवर लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवून घ्या. डार्क सर्कल कमी झालेले दिसतील.