'या' 5 पद्धतींनी गुलाब पाण्याचा करा वापर; त्वचेच्या आरोग्यासोबतच सौंदर्य जपण्यासही होईल मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 10:52 AM2018-09-15T10:52:30+5:302018-09-15T10:54:13+5:30
प्राचीन काळापासूनच गुलाब पाण्याचा सौंदर्यप्रसाधन म्हणून वापर करण्यात येतो हे आपण सारेच जाणतो. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते.
प्राचीन काळापासूनच गुलाब पाण्याचा सौंदर्यप्रसाधन म्हणून वापर करण्यात येतो हे आपण सारेच जाणतो. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते. चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या उत्पदनांसोबतच अनेक घरगुती उपायही करण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने गुलाब पाण्याचा वापर करण्यात येतो. यामुळे त्वचा उजळण्यास आणि मुलायम होण्यास मदत होते. जाणून घेऊयात गुलाब पाण्याचे काही असे उपाय, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेच्या रंग उजळवण्यासोबतच आरोग्य राखण्यासही मदत होईल.
1. स्कीन टोनर
बाजारात मिळणाऱ्या महागड्या टोनर ऐवजी दररोज सकाळी आणि रात्री गुलाब पाण्याचा वापर करा. यामुळे नैसर्गिक पद्धतीने चेहरा उजळवण्यास मदत होईल.
2. मॉयश्चरायझर
गुलाब पाणी मॉयश्चरायझरचेही काम करते. जेव्हा त्वचा गरजेपेक्षा जास्त शुष्क आणि निर्जीव दिसू लागते, त्यावेळी दिवसातून दोन वेळा गुलाब पाण्याचा मॉयश्चरायझर म्हणून वापर करा. दोन, तीन दिवसांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल.
3. मेकअप रिमूव्हर
बाजारातून अनेकदा आपण महागड्या ब्रॅन्ड्सचे मेकअप रिमूव्हर खरेदी करतो. त्यामुळे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी मदत होतेच पण त्यातील केमिकल्स त्वचेला हानी पोहोचवतात. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा.
4. डोळ्यांखाली सूज येणे
व्यवस्थित झोप न झाल्यामुळे किंवा थकवा आल्याने डोळ्यांखाली सूज येते. दररोज डोळ्यांखाली किंवा त्याच्या आजूबाजूला गुलाब पाणी लावल्याने सूज कमी होते. त्यामुळे डोळे फ्रेश दिसतात.
5. चेहऱ्यावरील पिंपल्स हटवण्यासाठी
चेहऱ्यावरील पिंपल्स हटवण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते. तुम्ही मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून हा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता. त्याचप्रमाणे फक्त गुलाब पाणी देखील चेहऱ्यवर लावू शकता. काही वेळ ठेवल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. गुलाब पाणी चेहऱ्यावरील घाण आणि पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करते.