ओठांचे सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी वापरा 'या' 5 टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 01:12 PM2018-08-01T13:12:52+5:302018-08-01T13:14:38+5:30
प्रत्येकजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो. त्यासाठी बाजारात उपलब्ध होणाऱ्या ब्यूटी प्रोडक्टसोबतच बऱ्याचदा घरगुती उपयांनाही प्राधान्य देण्यात येते. पण त्वचेसोबतच आपल्या ओठांची काळजी घेणंही तितकचं महत्त्वाचं आहे.
प्रत्येकजण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो. त्यासाठी बाजारात उपलब्ध होणाऱ्या ब्यूटी प्रोडक्टसोबतच बऱ्याचदा घरगुती उपयांनाही प्राधान्य देण्यात येते. पण त्वचेसोबतच आपल्या ओठांची काळजी घेणंही तितकचं महत्त्वाचं आहे. चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यामध्ये ओठांची मोठी भूमिका असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ओठांना सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.
ओठ हायड्रेट ठेवा
शरीरातील इतर अवयवांपैकी ओठांवर डिहायड्रेशनचा परिणाम लगेच होतो. त्यामुळे त्यांच सौंदर्य राखण्यासाठी दररोज कमीतकमी 3 लीटर पाणी संपूर्ण दिवसात पिणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातून टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी मदत होईल. आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होईल.
गडद रंगाच्या पेयांपासून दूर रहा
गडद रंगाचे लिक्विड्स बऱ्याचदा ओठांवर डाग सोडून जातात. यांमुळेच ओठांचा मूळ रंग बदलून जातो. त्यामुळे कॉफी, चहा, वाइन आणि इतर गडद रंगाच्या लिक्विड्सपासून लांब रहा. शक्य तेवढे त्यांचे सेवन करणं कमी करा.
स्क्रब करा
अनेकदा ओठांवर मोठ्या प्रमाणावर मृत पेशींचा एक थर जमा होतो. त्यामुळे ओठ फार काळपट दिसू लागतात. त्यासाठी तुम्ही घरगुती लिप स्क्रब तयार करू शकता. ऑलिव्ह ऑइल किंवा मध आणि साखर मिक्स करून त्याने ओठांवर हलक्या हाताने स्क्रब करा. त्यानंतर टिशू किंवा साफ कपड्याने पूसून घ्या आणि त्यावर लिप बाम लावा.
लिपस्टिक नीट साफ करा
रात्री झोपण्यापूर्वी ज्याप्रमाणे चेहऱ्यावरील मेकअप नीट साफ करून झोपता. त्याप्रमाणे लिपस्टिकही नीट साफ करा. अनेकदा लिपस्टीक ओठांवर तशीच राहिल्याने ओठांच्या त्वचेवर डाग तयार होतात. त्यामुळे ती नीट साफ करणं गरजेचं आहे.
सनस्क्रिनची गरज
आपल्या त्वचेप्रमाणेच ओठांनाही सनस्क्रिनची गरज असते. त्यामुळे ओठांना हेवी एसपीएफ लिप बाम लावा. लिपस्टिक लावण्याचा विचार करत असाल तरिदेखील त्याआधी एसपीएफ लिप बाम लावा. आणि त्यानंतर त्यावर लिपस्टिक लावा.