५ प्रकारचे असतात डॅंड्रफ आणि वेगवेगळे असतात त्यांचे उपाय, काय ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:58 AM2019-07-17T11:58:20+5:302019-07-17T12:05:47+5:30
सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, डॅंड्रफ डोक्याच्या त्वचा ड्राय असल्याने होतात. पण असं नाहीये. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, डॅंड्रफ एक किंवा दोन नाही तर तब्बल ५ प्रकारचे असतात.
(Image Credit : Miss Kyra)
महिला असो पुरूष आजकाल डॅंड्रफ म्हणजेच केसात कोंडा होण्याची समस्या सामान्य झाली आहे. केसांची योग्य स्वच्छता न करणे, केसांना गरजेनुसार तेल न लावणे, जास्त घाम येणे, हार्मोन्सचं असंतुलन आणि अनेकदा तणावामुळेही केसात डॅंड्रफ होतात.
सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, डॅंड्रफ डोक्याच्या त्वचा ड्राय असल्याने होतात. पण असं नाहीये. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, डॅंड्रफ एक किंवा दोन नाही तर तब्बल ५ प्रकारचे असतात. आणि ते दूर करण्याचे उपायही वेगवेगळे असतात. त्यामुळे जाणून घेऊ डॅंड्रफचे वेगवेगळे प्रकार आणि त्यापासून सुटका मिळवण्याचे उपाय.
फिक्सी डॅंड्रफ
(Image Credit : BlackDoctor)
ज्या लोकांना फिक्सी डॅंड्रफची समस्या असते, त्यांना आढळलं असेल की, केस करताना डॅंड्रफ डोक्याच्या त्वचेवरून केसात येऊन अडकतात. यात केसांच्या मूळात डॅंड्रफचा एक थर जमा राहतो. हा सामान्य डॅंड्रफ नाहीये. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बचावासाठी डोक्याची त्वचा चांगली स्वच्छ ठेवा आणि नियमित केस धुवावे. तसेच हेअर प्रॉडक्टचा वापरही कमी करा.
सोरायसिस
त्वचेसंबंधी अॅलर्जी, आजार किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन जसे की, सोरायसिसमुळे डॅंड्रफची समस्या होऊ लागते. ही समस्या डोक्याच्या त्वचेमध्ये सेल्सची निर्मिती वाढल्याने होते. हे सेल्स एक थर बनून निघू लागतात. जेव्हा त्वचेवरील हे सेल्स डोक्यावरील तेल किंवा धूळ-मातीमध्ये मिश्रित होतात, तेव्हा डॅंड्रफ होऊ लागतात.
याप्रकारची समस्या झाल्यावर तुम्ही घरगुती उपाय करण्याऐवजी डर्मोटॉलॉजिस्टना संपर्क करा. तुम्ही तुमचे हेअर प्रॉडक्ट आणि कंगवा कुणासोबतही शेअर करू नका. तसेच दुसऱ्यांच्या वस्तूही वापरू नका.
ऑयली डॅंड्रफ
(Image Credit : BeBeautiful)
जेव्हा डोक्याच्या त्वचेत सीबमचं प्रॉडक्शन जास्त होऊ लागतं तेव्हा ऑयली डॅंड्रफची समस्या समोर येते. यामागचं कारण केस नियमित स्वच्छ न करणे, जास्त घाम येणे आणि डोक्याची त्वचा तेलकट राहणे ही आहेत.
ऑयली डॅंड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा अॅंटी-डॅंड्रफ शॅम्पूने केस धुवावे. तसेच कांद्याचा रस १० ते १५ मिनिटांसाठी केसांना लावा. नंतर रेग्युलर शॅम्पूने केस धुवावे. आठवड्यातून कमीत कमी दोनदा हा उपाय करा.
फंगस
डोक्याच्या त्वचेमध्ये एक नैसर्गिक फंगस मलेएसेजिया असतो. पण हा फंगस एका लिमिटमध्ये तयार होतो. पण डोक्याची त्वचा जेव्हा जास्त तेलकट होते, तेव्हा त्यात धूळ-माती जास्त जमा होऊ लागते. त्यामुळे फंगसची निर्मितीही थांबते. अशात ओलिक अॅसिड तयार होऊ लागतं, ज्यामुळे स्कीन सेल्सचं प्रमाण वाढू लागतं आणि डोक्याच्या त्वचेवर एक पांढरा थर तयार होऊ लागतो. जो डॅंड्रफच्या रूपात दिसतो. यापासून बचाव करण्यासाठी केसांची नियमित चांगली स्वच्छता करावी आणि अॅंटी-डॅंड्रफ शॅम्पूचा वापर करावा.
ड्राय डॅंड्रफ
सामान्यपणे हिवाळ्यात ड्राय डॅंड्रफची समस्या समोर येते. हिवाळ्यात डोक्याच्या त्वचेचा ओलावा कमी होतो आणि डोक्याची त्वचा कोरडी होऊ लागते. अशा स्थितीत तुम्ही हेअर वॉशसाठी कोमट पाण्याचा वापर करू शकता. आठवड्यातून २ ते ३ वेळा आवळा ऑईलने डोक्याची मालिश करा. ३० मिनिटे ऑईल केसांना लावून ठेवा आणि गरम पाण्याने भिजलेल्या टॉवेलने केस बांधून ठेवा. याने डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा कमी होईल.