स्किन व्हाइटनिंगसाठी 'या' 5 टिप्स करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 05:29 PM2018-11-02T17:29:59+5:302018-11-02T17:30:56+5:30

आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु, दररोज उन्हामध्ये फिरल्याने किंवा प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो. यामुळे त्वचा काळपट दिसू लागते.

5 ways to naturally whiten skin at home | स्किन व्हाइटनिंगसाठी 'या' 5 टिप्स करतील मदत!

स्किन व्हाइटनिंगसाठी 'या' 5 टिप्स करतील मदत!

Next

आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु, दररोज उन्हामध्ये फिरल्याने किंवा प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो. यामुळे त्वचा काळपट दिसू लागते. त्वचेचा मूळ रंग परत मिळवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक फेअरनेस क्रिम किंवा इतर व्हाइटनिंग प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. परंतु यामध्ये अनेक केमिकल्स असतात त्यामुळे त्वचेची हानी होण्याचाही धोका असतो. जाणून घेऊयात काही घरगुती उपायांनी स्किन व्हाइटनिंग करण्याचे 5 नैसर्गिक उपाय...

1. दही

दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये दही हा प्रमुख पदार्थ आहे. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. जे त्वचा उजळवण्यासाठी आणि ब्लिचिंगसाठी फायदेशीर ठरतं. लॅक्टिक अॅसिडमध्ये एएचए म्हणजे अल्फा हायड्रॉक्सिल अॅसिड असतं, जे त्वचा उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

- अर्धा कप ताजं दही घ्या आणि स्किनवर लावा.

- त्यानंतर 4 ते 5 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि पाण्याने धुवून टाका. 

 - चांगल्या परिणामांसाठी हा उपाय दररोज करा. 

2. मध

मधामध्ये प्राकृतिक माइल्ड ब्लीचिंग गुणधर्म असतात. जे त्वचा उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. हे फक्त त्वचा उजळवण्यासाठीच नाही तर त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

- सर्वात आधी मध चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर 5 मिनिटांसाठी तसचं ठेवा. 

- त्यानंतर पाण्याने धुवून टाका.

- चांगल्या परिणामांसाठी हा उपयाच दररोज वापरा. 

3.  बेसन

बेसनामध्ये ब्लीचिंग आणि स्किन व्हाइटनिंग गुणधर्म असतात. हे स्किन एक्सफोलेटर म्हणूनही काम करतं. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठीही हे फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावरील पोर्समधील घाण स्वच्छ करण्यासाठीही हे उपयोगी ठरतं. 

एका बाउलमध्ये 1 चमचा बेसन, अर्धा चमचा मध, 1 चमचा मिल्क क्रिम आणि 2 ते 5 थेंब लिंबाचा रस मिक्स करा. तयार पेस्ट त्वचेवर लावून 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. 

4. हळद

हळदीचा वापर स्किन व्हाइटनिंगसाठी फार पूर्वीपासून करण्यात येतो. त्याचप्रमाणे त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यासाठीही हळदीचा वापर होतो. 

एका बाउलमध्ये हळदीची पावडर आणि मिल्क क्रिम एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. 

ही पेस्ट त्वचेवर लावा साधारण 10 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. 

5. टॉमेटो

टॉमेटोमध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा उजळवण्यास मदत होते. टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन-सी आणि एस्ट्रीजेंट गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे टॉमेटो अॅसिडिक असल्यामुळे त्वचेचं ऑइल दूर करतं. तुम्ही टॉमेटो वापरून पिम्पल्स आणि ऑयली त्वचेची समस्या दूर करू शकता. 

- सर्वात आधी टॉमेटाचा गर काढून एका बाउलमध्ये ठेवा.

- त्यानंतर हा गर त्वचेवर लावा.

- 10 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. 

Web Title: 5 ways to naturally whiten skin at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.