चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 10:52 AM2018-05-15T10:52:09+5:302018-05-15T10:52:09+5:30

बटाटे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमच्या सौंदर्यातही आणखी भर घालण्याच्या कामात येतात. त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या बटाटे दूर करतात. चला जाणून घेऊया बटाट्याचे हे खास फायदे....

5 Ways To Use Potato As A Beauty Product | चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर

googlenewsNext

(Image Credit : homeremedyfind.com)

बटाट्याचा आपण भाजी म्हणून वापर करतो. वेगवेगळ्या पदार्थांमध्येही बटाटे चवीसाठी वापरले जातात. काहींना बटाटे आवडतात तर काहींना आवडत नाहीत. पण बटाट्याचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. मात्र, कच्च्या बटाट्याचे फायदे अनेकांना माहीत नसतात. बटाटे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमच्या सौंदर्यातही आणखी भर घालण्याच्या कामात येतात. त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या बटाटे दूर करतात. चला जाणून घेऊया बटाट्याचे हे खास फायदे....

1) ड्राय स्कीनसाठी बटाटे आणि दही

जर तुमची स्कीन फार जास्त कोरडी झाली असेल तर चेहऱ्यावर बटाट्याचा फेस मास्क लावा. हे तयार करण्यासाठी 2-3 चमचे बटाट्याचा रस आणि त्यात एक चमचा दही टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. ही पेस्ट 15 मिनिटे ठेवल्यावर चेहरा पाण्याचे धुवून घ्या.

2) स्कीन टॅनिंगसाठी बटाटे आणि अंडे

उन्हामुळे जर तुमचा चेहरा काळा पडला असेल तर एका बटाट्याच्या रसात 1 चमचा अंड्याचा पांढरा भाग आणि 1 चमचा दही मिश्रीत करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने धूवून घ्या.

3) चेहरा उजळवण्यासाठी बटाटे आणि हळद

चेहरा उजळवण्यासाठी बटाट्याच्या रसात चिमुटभर हळद घाला. हे मिश्रण मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.

4) डोळ्यांखालचे काळे डाग दूर करा

डोळ्यांखालचे काळे डाग दूर करण्यासाठी कच्चा बटाटा कापा. कापलेले स्लाईस फ्रिजरमध्ये ठेवा आणि नंतर दोन्ही डोळ्यांवर 20 मिनिटे ठेवा. याने डोळ्यांखालचे काळे डाग दूर होतील. 

5) पिंपल्स दूर करण्यासाठी बटाटे आणि मुलतानी माती

तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर ते दूर करण्यासाटी बटाट्याची पेस्ट आणि मुलतानी माती मिश्रित करा. यात गुलाबजल मिश्रित करा. हा पॅक 30 मिनिटे चेपऱ्यावर लावून ठेवा.

Web Title: 5 Ways To Use Potato As A Beauty Product

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.