जबरदस्त! आंघोळीच्या पाण्यात टाका चिमुटभर तुरटी, फायदे इतके तुम्ही विचारही केला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 02:50 PM2024-09-28T14:50:56+5:302024-09-28T15:13:33+5:30
Bathing With Alum Water : तुम्हीही ऐकलं असेल की, बरेच लोक आंघोळीच्या पाण्यावर तुरटी फिरवतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे फायदे काय होतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
Bathing With Alum Water : तुरटीचा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून वापर केला जातो. तुरटी ही एक नॅचरल बाब आहे. शेविंग केल्यानंतर किंवा दाढी करताना कापलं गेलं तर तुरटी लावली जाते. तसेच तुरटीचे इतरही अनेक फायदे होतात. अशात तुम्हीही ऐकलं असेल की, बरेच लोक आंघोळीच्या पाण्यावर तुरटी फिरवतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे फायदे काय होतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
थकवा आणि वेदना होईल दूर
आंघोळीच्या पाण्यात जर तुरटी फिरवली आणि या पाण्याने आंघोळ केली तर दिवसभराचा थकवा, शरीरावरील धूळ-माती दूर होते. तसेच या पाण्याने मांसपेशींना आरामही मिळतो. जर तुम्ही एखाद्या फिजिकल अॅक्टिविटीनंतर थकलेले असाल तर तुरटीच्या पाण्याने आंघोळ करा. तसेच तुरटी टाकलेल्या गरम पाण्यात पाय ठेवून बसल्याने पायांची वेदनाही कमी होते.
केस, त्वचा, दातांसाठी फायदेशीर
तुरटी केस, त्वचा आणि दातांसाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवली तर शरीराची दुर्गंधी, शरीरावरील घाण दूर होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी सकाळी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. इतकंच नाही तर तुरटीच्या पाण्याने त्वचेची मालिश करा. सुरकुत्या गायब होतील.
तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
एक्सपर्ट्सनुसार, तुरटीच्या पाण्याने सांधेदुखी दूर होते आणि नसाही मोकळ्या होतात. तुरटीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. हे केस आणि डोक्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. ज्यांना कोंड्याची समस्या आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरावावी.
यूरिन इन्फेक्शन होईल दूर
महिलांना नेहमीच यूरिन इन्फेक्शनची समस्या होत असते. अशात दिवसातून दोन वेळा तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केले तर फायदा मिळेल.
जास्त येणारा घाम होईल कमी
काही लोकांना उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो. पण हिवाळ्यातही काहींना घाम येतो. अशात तुरटी घामाला कंट्रोल करू शकते. ज्यांना जास्त घाम येतो त्यांना तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ करावी.
सूज होईल कमी
तुरटीमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण आढळतात जे शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतात. तसेच पिंपल्ससाठी कारणीभूत असणारे बॅक्टेरिया तुरटीमुळे नष्ट होतात. तुरटी लावल्याने त्वचेची जळजळ कमी होते.