सोशल मीडियात व्हायरल होतोय #60secondrule; जाणून घ्या काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 03:35 PM2019-01-31T15:35:40+5:302019-01-31T15:37:09+5:30
जर तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला 60 सेकंदांच्या फेसवॉश रूलबाबत नक्की माहीत असेल. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर अनेक महिला हा 60 सेकंदांचा फेसवॉश रूल फॉलो करताना दिसत असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.
जर तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला 60 सेकंदांच्या फेसवॉश रूलबाबत नक्की माहीत असेल. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर अनेक महिला हा 60 सेकंदांचा फेसवॉश रूल फॉलो करताना दिसत असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. स्किन केयर स्पेशलिस्ट LaBeautyologistने चेहरा स्वच्छ करण्याच्या पद्धतीचा एक व्हिडिओ #60secondrule या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर केला केला होता. त्यानंतर जगभरातील अनेक महिला आणि तरूणी इम्प्रेस्ड झाल्या असून हा रूल अप्लाय करून आपले फोटो आणि व्हिडीओ हॅशटॅगसह सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. या रूलअंतर्गत तुम्हाला दिवसभरामध्ये 2 वेळा आणि 60 सेकंद म्हणजेच एक मिनिटासाठी आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे.
स्किन केयर टिप
1 मिनिटापर्यंत फेसवॉश करण्याचा हा ट्रेन्ड इंटरनेटवर व्हायरल होत असून लोक यामुळे झालेल्या ट्रांसफॉर्मेशनचे फोटो ऑनलाइन शेअर करत आहेत. न्यामका रॉबर्ट स्मिथ नावाच्या एका यूट्यूबरने आपला एक टूटोरियल व्हिडीओ शेअर केला होता. तिने सांगितले की, '60 सेकंदांचा हा फेसवॉश रूल एक नॉर्मल स्किन केयर टिप आहे. जो मी माझ्या सबस्क्रायबर्ससोबत शेअर केला होता. ज्यामुळे ते आपल्या महागड्या क्लिंन्जर्सचा पूर्णपणे उपयोग करू शकतील.' जेव्हा तुम्ही 60 सेकंदांपर्यंत आपल्या हाताच्या बोटांनी तुमचा चेहरा स्वच्छ करता त्यावेळी क्लिंजरमध्ये असलेले इन्ग्रीडियंट्स व्यवस्थित त्वचेमध्ये मुरतात. 60 सेकंद रूलमुळे तुमची स्किन मुलायम होते आणि ब्लॉकेज ओपन होतात. तसेच स्किनचा टेक्सचर आणि इव्हननेस उत्तम होतं.
मॅक्सिमम स्किन बेनिफिट्स
जर तुम्हाला तुमच्या फेसवॉशने मॅक्सिमम स्किन बेनिफिट्स मिळवायचे असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर ब्रेकआउट नको असतील तर सकाळी आणि रात्री असं, दिवसातून 2 वेळा 60 सेकंदांसाठी फेसवॉश रूल फॉलो करा. त्याचबरोबर तुम्हाला या गोष्टीचीही काळजी घेणं गरजेचं आहे की, तुम्ही ज्या क्लिंजरचा वापर करत आहात, त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये एखाद्या प्रकारचं इरिटेशन होणार नाही. त्याचबरोबर फेसवॉशने चेहरा स्वच्छ करताना डोळ्यांच्या आजूबाजूलाही हलक्या हाताने मसाज करणं आवश्यक आहे.
स्किनवर व्यवस्थित मसाज करा
ब्युटी एक्सपर्ट्सच्या मते, जेव्हा तुम्ही क्लिंजर किंवा फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करता त्यावेळी चेहऱ्यावर व्सवस्थित मसाज करणं आवश्यक आहे. कारण चेहऱ्यावर असलेलं मेकअप, घाण, प्रदूषण इत्यादी हटवण्यासाठी थोडा वेळ देण्याची गरज असते. त्याचबरोबर नाकाच्या आजूबाजूच्या भागामध्ये, हेयरलाइन असणारा भाग व्यवस्थित स्वच्छ करणं आवश्यक असतं. कारण जास्तीत जास्त लोक फक्त गाल आणि चेहरा स्वच्छ करतात. परंतु अनेक भाग व्यवस्थित स्वच्छ करणं विसरून जातात.
Just a few weeks apart. @LaBeautyologist’s #60SecondRule 🙌🏾👏🏾 pic.twitter.com/98RAt5Fb8F
— Cici 🥳 (@cyennaaaa) December 8, 2018
Shoutout to @LaBeautyologist for the #60SecondRule. I went from this to this in less than a month 💓 pic.twitter.com/yg48bvH5Sj
— mariahdyson ❁ॐ☾ (@M_riah) November 29, 2018