वायुप्रदूषणामुळे होणारं त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:28 PM2018-10-30T17:28:58+5:302018-10-30T17:30:26+5:30

वायुप्रदूषणाची समस्या इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त होते. वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या समस्यांसोबतच स्किन आणि केसांच्याही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये अनेक लोक सतत चेहरा धुणं टाळतात.

7 special tips for skin care in air pollution and cold | वायुप्रदूषणामुळे होणारं त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी अशी घ्या काळजी!

वायुप्रदूषणामुळे होणारं त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी अशी घ्या काळजी!

googlenewsNext

(Image Creadit : Kopitiam Bot)

वायुप्रदूषणाची समस्या इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त होते. वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या समस्यांसोबतच स्किन आणि केसांच्याही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये अनेक लोक सतत चेहरा धुणं टाळतात. त्यामुळे त्वचेची चमक नाहीशी होते आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. त्यामुळे थंडीमध्ये त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. थंडी आणि वायुप्रदुषम त्वचेसाठी फार हानिकारक ठरतं. जाणून घेऊयात वायुप्रदूषणापासून त्वचेची काळजी घेण्याबाबतच्या काही खास टिप्स...

घरातून बाहेर पडताना चेहऱ्यावर स्कार्फ बांधा. जर स्कार्फ बांधणं शक्य नसेल तर ऑफिसमध्ये किंवा घरी पोहोचल्यावर चेहरा स्वच्छ करा. 

थंडीमध्ये चेहरा स्वच्छ करण्यासाठी केमिकल असलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करणं टाळा. केमिकल असलेले प्रोडक्ट्स वायू प्रदुषणामुळे जास्त नुकसान पोहोचवतात. 

प्रदूषणामुळे होणारं चेहऱ्याच्या स्किनचं नुकसान टाळण्यासाठी घरी तयार करण्यात आलेले फेसवॉश आणि फेसपॅक करणं फायदेशीर ठरतं. यामुळे स्किन चमकदार ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

गुलाब पाण्यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि मध मिक्स करून याची पेस्ट तयार करा. याने चेहरा, हात आणि मानेवर मसाज करा. एका तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे स्किनचं डिटॉक्सीफिकेशन होण्यास मदत होते. 

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी संत्री आणि लिंबाच्या साली उन्हामध्ये सुकवून घ्या आणि त्या मिक्सरमध्ये बारिक करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर आणि कच्च दूध एकत्र करून लावा. त्यामुळे स्किन चमकदार होण्यास मदत होते. 

केसांची काळजी घेण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावून मालिश करा. सकाळी उठून केस धुवून टाका.
 
फक्त वातावरणचं नाही तर आहाराकडेही लक्ष द्या. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचसोबत ताजी फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करा.

Web Title: 7 special tips for skin care in air pollution and cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.