डिहायड्रेशनची 7 लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2016 03:06 PM2016-06-17T15:06:08+5:302016-06-17T20:36:08+5:30
आपल्याला कसं कळणार की, पाण्याची पातळी कमी झाली आहे? त्यासाठी पुढील लक्षणांवर नीट नजर ठेवा.
प णी म्हणजे जीवन. पाण्याला दुसरा पर्याय नाही. पाणी केवळ आपली तहान नाही तर संपूर्ण आरोग्यसंस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ द्यायची नसते. त्याला डिहायड्रेशन म्हणतात.
पण आपल्याला कसं कळणार की, पाण्याची पातळी कमी झाली आहे? त्यासाठी पुढील लक्षणांवर नीट नजर ठेवा.
1. मुड खराब असणे
डिहायड्रेशन झाल्यावर चीडचीडपणा आणि रागराग होतो. सतत मुड बदलत राहतो.
2. श्वास दुर्गंधी
डिहायड्रेशनमध्ये तोंडातील लाळेची निर्मिती घटून बॅक्टेरिआ वाढतात. त्यामुळे मुखातून श्वासगणिक दुर्गंधी बाहेर पडते.
3. स्नायू ताणने
उष्णतेमुळे स्नायू ताणले जाऊ शकतात. पाण्याची पातळी कमी झाल्यावर तर ‘मसल क्रॅम्पिंग’चा त्रास वाढतो.
4. अधिक गोड खावेसे वाटणे
तुम्हाला अचानक गोडधोड खाण्याची अतीव इच्छा निर्माण झाली तर डिहायड्रेशनची शक्यता नाकारता येत नाही. अपुऱ्या पाण्याच्या पातळीमुळे ग्लायकोजिन निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊ गोड खाण्याची इच्छा उत्पन्न होते.
5. व्यायामात अडचणी येणे
दररोज करणारा व्यायामही जर पूर्ण करण्यात अडचणी येत असतील तर याचे कारण डिहायड्रेशन असू शकते. पाण्याची पातळी कमी झाल्यावर ब्लड प्रेशर वाढून हृदयाचा वेग वाढतो. त्यामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते.
6. अश्रु न येणे
तुम्ही रडत असाल आणि डोळ्यातून पुरेसे पाणी टिपकत नसेल तर शरीराला पाण्याची नितांत गरज आहे असे समजून जावे.
7. धुसर दिसणे
जेव्हा शरीरात पाण्याची पातळी घटते तेव्हा डोळे कोरडे पडून दृष्टी धुसर होते. आपल्याला ब्लर दिसू लागते.