दाढीचे केस लवकर वाढवण्यास या 7 गोष्टींची होईल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 11:56 AM2018-06-11T11:56:01+5:302018-06-11T11:56:01+5:30

काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला चांगली दाट दाढी येऊ शकते. तुम्हालाही दाढीवाला खास लूक हवा असेल तर खालील गोष्टी कराव्या लागतील. 

7 Things To Do Everyday To Make Your Beard Grow Much Faster | दाढीचे केस लवकर वाढवण्यास या 7 गोष्टींची होईल मदत!

दाढीचे केस लवकर वाढवण्यास या 7 गोष्टींची होईल मदत!

googlenewsNext

दाढी वाढवण्याचा आणि दाढीला वेगवेगळे कट देण्याचा ट्रेंड अलिकडे चांगलाच वाढला आहे. काही बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सनीही हा लूक अधिक प्रसिद्ध केला. त्यामुळे त्यांचे चाहतेही तसाच लूक ठेवण्याकडे अधिक वळले आहेत. अशात दाढी असलेल्या मुलांकडे मुली अधिक आकर्षक होतात असाही रिसर्च असल्याने हा ट्रेंड अधिक वाढतोय. अशावेळ सर्वांनाच चांगली आकर्षक दाढी येते असे नाही. काहींना इच्छा असूनही दाढी ठेवता येत नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला चांगली दाट दाढी येऊ शकते. तुम्हालाही दाढीवाला खास लूक हवा असेल तर खालील गोष्टी कराव्या लागतील. 

1) चेहऱ्याची मसाज

चेहऱ्याची मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवरील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. त्यामुळे दाढीचे केस वाढण्यास मदत होते. सोबतच चेहराही आणखी फ्रेश दिसतो. 

2) प्रोटीन असलेले पदार्थ खा

दाढीचे केस वाढण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असलेले पदार्थ असायला हवेत. जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यास लगेच फरक दिसेल. 

3) आवळा तेलाने दाढीची मसाज

आवळ्याच्या तेलाने दाढीचे केस आणि चेहऱ्याच्या त्वचेची मसाज करा. यानेही केस वाढण्यास मदत होते. 

4) घाई करु नका

तुम्हाला चांगली आकर्षक दाढी यायला जरा वेळ लागेल. लगेच दाढीचे केस वाढणार नाहीत. त्यामुळे सतत स्ट्रिमिंग करु नका. दाढी चांगली वाढू द्या आणि त्यानंतर त्याला शेप द्या.

5) व्यायाम करा

तुमच्या केसांची वाढ ही तुमच्या आरोग्यावर अवलंबून असते. जर तुमचं शरीरच योग्य शेपमध्ये नसेल तर नुसती दाढी वाढवून काय फायदा. त्यामुळे व्यायाम करा जेणेकरुन तुम्ही फिट आणि आणखी हॅंडसम दिसाल. 

6) पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप न होणे हे कारण तुमची दाढी वाढण्यात अडथळा ठरु शकतं. स्ट्रेसमुळे पुरेशी झोप नाही आणि त्याकारणाने तुमच्या दाढी केसांची वाढ खुंटते. अशात पुरेशी झोप आवश्यक आहे. 

7) चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवा

चेहऱ्याची त्वचा स्वच्छ नसेल तर दाढीचे केस वाढण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे वेळेवर स्क्रब करा, चेहरा नेहमी पाण्याने धुवा, ड्राय आणि ऑईली स्कीनची खास काळजी घ्या. 
 

Web Title: 7 Things To Do Everyday To Make Your Beard Grow Much Faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.