त्वचेवरील पिंपल्स, डाग, सुरकुत्या, थकवा दूर करण्यासाठी 'ग्रीन टी'चा असा करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 11:16 AM2019-12-31T11:16:13+5:302019-12-31T11:16:35+5:30

ग्रीन टी सेवन केल्याने आपलं मेटाबॉलिज्म जेवढं चांगलं राहतं, तेवढीच आपली त्वचाही चांगली राहते.

Acne free skin with green tea bags | त्वचेवरील पिंपल्स, डाग, सुरकुत्या, थकवा दूर करण्यासाठी 'ग्रीन टी'चा असा करा वापर!

त्वचेवरील पिंपल्स, डाग, सुरकुत्या, थकवा दूर करण्यासाठी 'ग्रीन टी'चा असा करा वापर!

Next

(Image Credit : lucytriesit.com)

ग्रीन टी सेवन केल्याने आपलं मेटाबॉलिज्म जेवढं चांगलं राहतं, तेवढीच आपली त्वचाही चांगली राहते. जर तुम्हाला वाटत असेल की, त्वचा डल वाटतीये किंवा पिंपल्स, डागांची समस्या आहे तर तुम्ही ग्रीन टी चा वापर त्वचेवर करू शकता. काही दिवसातच त्वचेवरील डाग किंवा पिंपल्सची समस्या याने दूर होऊ शकते.

सुरकुत्या दूर करा

ग्रीन टी मध्ये अ‍ॅंटी-एजिंग ऑक्सिडेंट्स असतात. यांच्या मदतीने त्वचेवर वाढत्या वयाची लक्षणे दिसून येत नाहीत. ग्रीन टी टोनर किंवा घरीच ग्रीन टी बॉइल करून थंड झाल्याव कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. याने प्रदूषणाचा त्वचेवरील प्रभावही दूर होईल.

नॅच्युरल ग्लो

(Image Credit : thegeneralpost.com)

ग्रीन टी त्वचेवर नॅच्युरल ग्लो मिळवण्यासही मदत करते. यासाठी तुम्ही ग्रीन टी बॅग्सचा वापर करू शकता. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स फेकण्याऐवजी हलक्याने हाताने त्यांना प्रेस करून त्यातील पाणी काढून टाका. त्यानंतर बॅग दोन्ही डोळ्यांवर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. याने डोळ्यांचा थकवा दूर होईल.

डस्ट दूर करण्यासाठी

तुम्ही ग्रीन टी चा वापर चेहऱ्यावर जमा झालेले धुळीचे कण स्वच्छ करण्यासाठी करू शकता. यासाठी भिजलेल्या ग्रीन टी बॅगचा टिश्यू प्रमाणे वापर करा. चेहऱ्यासोबतच मानेवरील त्वचाही याने स्वच्छ करा. ग्रीन टी एक चांगलं मेकअप रिमुव्हरही आहे.

गुलाबजलसोबत

(Image Credit : YouTube)

ग्रीन टी गुलाबजलसोबत मिश्रित करून त्वचेवर क्लिंजरप्रमाणे किंवा टोनरप्रमाणे वापरू शकता. गुलाबजलमधील तत्व त्वचेचा रंग खुलवण्यासाठी मदत करतात. तसेच त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणेही याने दूर केली जातात. पिंपल्स आणि डागही त्वचेवरून दूर होतील.


Web Title: Acne free skin with green tea bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.