'या' 4 चुका ठरतात पिंपल्स येण्यासाठी कारणीभूत!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 02:09 PM2018-12-05T14:09:57+5:302018-12-05T14:12:37+5:30
प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं. तसेच सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी अनेकजण सतत काहीना काही उपाय करत असतात. अनेक तरूण-तरूणींना नेहमीच चेहऱ्यावरील पिंपल्सचा सामना करावा लागतो.
प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं. तसेच सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी अनेकजण सतत काहीना काही उपाय करत असतात. अनेक तरूण-तरूणींना नेहमीच चेहऱ्यावरील पिंपल्सचा सामना करावा लागतो. पिंपल्स येणाची अनेक कारणं असतात. प्रदुषण, शरीरात होणारे बदल, धूळ, घाण, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन ही कारणंही चेहऱ्यावर पिंपल्स येणासाठी जबाबदार ठरतात. त्वचेची व्यवस्थित काळजी न घेणं आणि केसांकडे केलेल्या दुर्लक्षामुळेही पिंपल्स येऊ शकतात. कधी कधी जेव्हा आपण आपल्या त्वचेला क्लिंजिंग करतो. त्यावेळी आपल्या त्वचेवरील रोमछिद्र मोठी होऊन त्यामध्ये घाण जमा होते. यामुळेही चेहऱ्यावर घाण जमा होते. यापासून सुटका करण्यासाठी योग्य उपाय शोधण्याआधी पिंपल्स येण्याचं खरं कारण जाणून घेणं गरजेच आहे.
या कारणांमुळे होते पिंपल्सची समस्या :
1. सतत केस चेहऱ्यावर येणं
केस सतत चेहऱ्यावर आल्यामुळेदेखील पिंपल्सची समस्या होऊ शकते. जर तुमचे केस सतत त्वचेच्या संपर्कात येत असतील तर हे त्वचेवर बॅक्टेरिअल इंटरफेरेंस होण्याचं कारण ठरतं. त्यामुळे केस सतत त्वचेच्या संपर्कात येऊ देऊ नका.
2. आंघोळ न करणं
वर्कआउट केल्यानंतर आंघोळ करणं गरजेचं असतं. वर्कआउट करताना आपल्याला फार घाम येतो आणि या घामाद्वारे शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे वर्कआउट केल्यानंतर आंघोळ केली नाही तर हे घटक शरीरावर तसे रहतात आणि परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे वर्कआउट केल्यानंतर आंघोळ करणं आणि केस धुणं गरजेचं असतं.
3. केसांमध्ये होणारा कोंडा
चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवण्यासाठी केसांतील कोंडाही कारणीभूत ठरतो. केसात होणारा कोंडा म्हणजे स्काल्पला होणारं बॅक्टेरिअल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन होय. जे केसांमार्फत आपल्या त्वचेवरही पसरतं. त्यासाठी अॅन्टीडॅन्ड्रफ शॅम्पूचा वापर करा आणि केस मोकळे सोडू नका.
4. हेअर स्टाइल्स
केसांच्या हेअर स्टाइल करण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे स्काल्प कोरडे होतात. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी स्काल्पमध्ये अधिक तेल तयार होतं. तसेच त्वचाही तेलकट होते. परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. याव्यतिरिक्त आपण अनेकदा हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतो. जे त्वचेसाठी नुकसानदायी ठरतात. यामुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येतात.