करिना कपूरप्रमाणे स्मोकी आइज लूक हवाय?; या टिप्स फॉलो करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 11:42 AM2019-04-07T11:42:25+5:302019-04-07T11:46:43+5:30

फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणता ट्रेन्ड येईल याचा अंदाज नाही. तसंच काहीसं मेकअपच्या बाबतीत आहे. मेकअप सेंस नेहमी बदलत असतो. याआधी लाइट आय मेकअप आणि बोल्ड लिपस्टिक ट्रेंडमध्ये होती.

Actress kareena kapoor khan inspired smokey eyes and nude lipstick makeup | करिना कपूरप्रमाणे स्मोकी आइज लूक हवाय?; या टिप्स फॉलो करा

करिना कपूरप्रमाणे स्मोकी आइज लूक हवाय?; या टिप्स फॉलो करा

Next

फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणता ट्रेन्ड येईल याचा अंदाज नाही. तसंच काहीसं मेकअपच्या बाबतीत आहे. मेकअप सेंस नेहमी बदलत असतो. याआधी लाइट आय मेकअप आणि बोल्ड लिपस्टिक ट्रेंडमध्ये होती. आता ट्रेन्ड स्मोकी आइज आणि न्यूड लिपस्टिकचा आहे. जर तुम्हीही तुमच्या रोजचाच मेकअप करून कंटाळला असाल तर आजच तुमची मेकअप स्टाइल बदला आणि डोळ्यांसाठी स्मोकी स्मोकी आइज लूक आणि ओठांसाठी  न्यूड लिपस्टिक कलरचा वापर करा. 

बॉलिवूड अभिनेत्रींबाबत बोलायचे झालेचं तर अभिनेत्री करिना कपूर आपल्या प्रत्येक लूकमध्ये परफेक्ट दिसते. मग तो जिम लूक असो किंवा रेड कार्पेट लूक. तिचा लूक नेहमी परफेक्टच असतो. याशिवाय करिना नेहमी ट्रेन्डी स्टाइल्स फॉलो करताना दिसते. 

मेकअप डिझायनर्सच्या मते, सध्या स्मोकी आय मेकअपचा ट्रेन्ड आहे. करिनाप्रमाणेच अनेक अभिनेत्री हा ट्रेन्ड फॉलो करताना दिसत आहेत. स्मोकी आय मेकअप खासकरून ब्लॅक आणि ग्रे टोनमध्ये करण्यात येतो. तरिसुद्धा तुम्हाला कोणत्याही वेगळ्या कलरने डोळ्यांना स्मोकी लूक देण्याची इच्छा असेल तर आय मेकअप करू शकता. त्यामुळे डोळे लांबूनच हायलाइट होतात. हे स्टेप बाय स्टेपच करणं गरजेचं असतं. नाहीतर स्मोकी लूक बिघडू शकतो. 

डोळ्यांना स्मोकी लूक आणि लिप्सला न्यूड कलर करण्यासाठी टिप्स :

1. सर्वात पहिल्यांदा थोडंस प्रायमर घ्या आणि आयलिड्सवर लावा. हे लावणं अत्यंत आवश्यक असतं. कारण उकाडा आणि ऑयली फेस यांमुळे आयशॅडो क्रीज लाइनवरून पसरतं. परंतु जर तुम्ही प्रायमर वापरत असाल तर मेकअप पसरणार नाही. 

2. त्यानंतर लॅशलाइनवर आयलायनर लावा. आयलायनर जेल किंवा स्कॅच असेल तर अधिक उत्तम ठरेल. 

3. आता स्मजर ब्रश किंवा आय बडच्या मदतीने आयलायनर व्यवस्थित स्मज करून घ्या. आता आयशॅडो अप्लाय करा. कलर्स तुमच्या आवडीनुसार निवडा. डोळ्यांवर तुमच्या आवडीचा आयशॅडो लावा. ब्रशच्या मदतीने क्रिज लाइनच्या खाली आयशॅडो व्यवस्थित स्मज करा. तुम्ही आयशॅडोचा वापर करू शकता. 

4. राउंड ब्लॅडिंग ब्रशच्या मदतीने आयशॅडोच्या वरती नवीन रंग अप्लाय करा. तुम्ही ग्रे ब्लॅक, मरून, पर्पल किंवा ब्राउन कोणत्याही कलर्सचा वापर करू शकता. परंतु लक्षात ठेवा की, या आयशॅडोला क्रीज लाइनच्या खालच्या बाजूला लावा. त्यामुळे डोळ्यांना पूर्णपणे स्मोकी लूक मिळण्यासाठी मदत होइल. जर तुम्हाला स्मोकी ग्लिटरी लूक पाहिजे असेल तर स्मोकी मेकअपनंतर ग्लिटरचा वापर करा. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Actress kareena kapoor khan inspired smokey eyes and nude lipstick makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.