ग्रीन टीचा प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2016 01:26 PM2016-07-14T13:26:41+5:302016-07-14T18:56:41+5:30
ग्रीन टी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे आणि त्यांनी आतापासून स्वत:ला सावरुन घ्यावे...........
Next
ग्रीन टी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे आणि त्यांनी आतापासून स्वत:ला सावरुन घ्यावे, कारण एका नव्या अध्ययनानुसार असे आढळुन आले आहे की, ग्रीन टी आपल्या प्रजनन क्षमतेला विशेष प्रभावित करु शकते. आतापर्यंत आपल्याला हेच माहित होते की, ग्रीन टी साधारण चहाच्या तुलनेने आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे, मात्र या नव्या संशोधनानुसार एक सत्य समोर आले आहे की, सततच्या सेवनाने प्रजनन क्षमतेवर खूपच प्रतिकू ल प्रभाव पडतो.
अमेरिके तील कॅलिफोर्निया-इरविन यूनिव्हर्सिटीच्या एका समुहाने फ्रूट फ्लाइस (फळ माशी) वर करण्यात आलेल्या परिक्षणातून असे आढळून आले की, ग्रीन टीच्या जास्त खपाने तिचा विकास आणि प्रजनन क्षमता प्रभावित झाली आहे. वैज्ञानिकांच्या मतानुसार, ग्रीन टीची वाढती लोकप्रियतेमुळे तिच्या सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र आरोग्याचा विचार केला तर हे चुकीचे आहे. या अध्ययनात हे सांगण्यात आले आहे की, ग्रीन टी किंवा अन्य कोणत्याही प्राकृतिक उत्पादनांचे अत्यधिक सेवन आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते.
फार्मास्युटिकल साइंसेजचे सहाय्यक प्राध्यापक महताब जाफरी सांगतात की, ‘ग्रीन टीच्या योग्य सेवनाने आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडतो, मात्र अति सेवन आरोग्यासाठी खूपच घातक होऊ शकते.’ त्यांनी सांगितले आहे की, कोणताही ठोस निर्णय देण्याअगोदर अजून आम्हाला या संशोधनावर खूप काम करायचे आहे, मात्र सल्ला असा आहे की, शक्य तेवढ्या कमी प्रमाणात सेवन करा.
वैज्ञानिकांनी ड्रोसोफिला मेलानोगास्टर फ्रूट फ्लाईवरील ग्रीन टीचे घातक परिणामांच्या परिक्षणावरून हा अंदाज बांधला आहे. त्यांनी पाहिले की, ज्या माशांचे लार्वा आणि भ्रूण ग्रीन टी पॉलीफिनाल्स (एन्टी आॅक्सीडेंट)चे विविध मात्रांचे अधीन होते, त्यांच्या पिलांमध्ये मंद गतीने विकास आणि आगळावेगळा बदल पाहण्यात आला. महताब जाफरींच्या मते, ग्रीन टीच्या अधिक मात्राच्या सेवनाने पेशी मरतात.
त्यांनी सांगितले की, ‘केमेलिया सिनेसिसचे उत्पन्न ग्रीन टी संपूर्ण जगात आपल्या गुणांनी प्रसिद्ध आहे, मात्र आम्ही याचे संशोधन कुत्रा आणि उंदिरांवर केले, तर ग्रीन टीच्या अधिक सेवनाने त्यांचे वजन कमी झाले आणि सोबतच चकीत करणारा खुलासा झाला जो म्हणजे भ्रूणचा विकासदेखील पूर्णत: प्रभावित झाला.
ग्रीन टीचे अजून काही प्रतिकूल परिणाम
ग्रीन टी मध्ये अनेक प्रकाराचे स्वास्थ वर्धक गुण आहेत. जसे की, वजन कमी करणे, त्वचेचे सौंदर्य वाढविणे, केसांची गळती थांबविणे आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढणे आदी. मात्र ग्रीन टीचे अति सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ते असे की, ग्रीन टी अॅसिडिटी, जूलाब, उलटी, चक्कर आणि डोकेदुखी निर्माण करु शकते. ग्रीन टी मध्ये कॅफीन असते, ज्यामुळे निद्रानाश होऊ शकते.
कधी आणि कशी घ्यावी ग्रीन टी?
ग्रीन टीला ताजीच प्यावी. फ्रेश तयार असलेली ग्रीन टी शरीरासाठी चांगली आणि आरोग्यवर्धक असते. आपण गरम किंवा थंड करूनही पिऊ शकता, मात्र हे लक्षात ठेवा की चहा एकातासापूर्वीची नसावी. तसेच जास्तच उकडता गरम चहा गळ्याच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतो, म्हणून जास्त गरम चहा देखील पिऊ नये. जर आपण चहाला जास्त वेळपर्यंत स्टोर करून ठेवाल तर त्यातील विटामिन आणि एंटी-आॅक्सिडेंट गमवून बसाल. तसेच यातील जीवाणूरोधी गुण देखील काही काळानंतर कमी होतात. वास्तविक चहा जास्त वेळपर्यंत ठेवली तर त्यात बॅक्टेरियादेखील निर्माण होतात. त्यामुळे नेहमी ताजी ग्रीन टी प्या.
जेवणाअगोदर एक तास आधी प्या
ग्रीन टीला जेवणाअगोदर एक तास आधी प्याल्याने वजन कमी होते. हिला पिल्याने भूक कमी लागते. कारण ही आपल्या भूकेवर नियंत्रण ठेवते. ग्रीन टी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी अजिबात पिऊ नये.
औषधांसोबत घेऊ नये
औषध आणि ग्रीन टीचा साइट इफेक्ट टाळण्यासाठी या दोन्हींना कधी एकसोबत घेऊ नये. औषधे नेहमी पाण्यासोबतच घ्यावेत.
जास्त कडक नसावी
जास्त कडक ग्रीन टीमध्ये कॅफिन आणि पोलीफिनॉलची मात्र खूप जास्त असते. याचा शरीरावर खूप प्रतिकूल परिणाम होत असतो. तेज आणि कडवट ग्रीन टी पिल्याने पोटाचे विकार, निद्रानाश आणि चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
फक्त दोन-तीन कप
मगाशी सांगीतले आहे की, अति सेवनाने अपाय होऊ शकतो. जर आपण रोज दोन ते तीन कपापेक्षा जास्त ग्रीन टी पित असाल तर आरोग्यासाठी घातकच आहे. कारण त्यात कॅफिन असते, यासाठी तीन कपापेक्षा जास्त पिऊ नये.