लग्नानंतर दारूची सवय होते कमी !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2016 01:48 PM2016-09-27T13:48:04+5:302016-09-27T19:18:04+5:30

ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे.

After marriage, alcohol consumption is low! | लग्नानंतर दारूची सवय होते कमी !

लग्नानंतर दारूची सवय होते कमी !

Next

/>लग्न केल्यानंतर दारू पिणाऱ्या व्यक्तिची दारूची सवय ही कमी होते. हे वाचूून कदाचित आपला विश्वास बसत नसेल. परंतु, ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे. लग्नाअगोदर अनेकजण दारूच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. मात्र, वैवाहिक जीवन सुरु होताच, त्यांच्यात दारू पिण्याची सवय ही कमी व्हायला लागते.
र्जीनिया विद्यापीठाचे लेखक डायना दिनेस्क्यू यांच्या म्हणण्यानुसार वैवाहिक जीवन सुरु झाल्यानंतर दोघात  येणारे संबंध हे व्यसन कमी होण्यासाठी लाभदायी ठरतात. याचे कारण दोघेही एकमेकांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्यांच्यातील दारू पिण्याची सवय ही कमी होते.

या संशोधनात १ हजार ६१८ महिला व ८०७ पुरुषांवर हे संशोधन करण्यात आले. यामध्ये घटस्फोटीत, लिव्ह इन रिलेशनशिप, विवाहित व एकटे राहणाºयांचा समावेश करण्यात आला होता. आपल्या पार्टनर सोबत असल्यानंतर दारु पिण्याची सवय ही कमी होते असा यामधून निष्कर्ष निघाला. दोघांचे नाते संपल्यानंतरही दारु पिण्याची सवय ही मोठ्या प्रमाणात वाढते.

Web Title: After marriage, alcohol consumption is low!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.