पुरळ किंवा पिंपल्स फोडल्यावर चेहऱ्यावर डाग पडणे कसे रोखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:49 PM2018-10-29T12:49:56+5:302018-10-29T12:52:50+5:30

चेहऱ्यावर पुरळ येणे ही एक सामान्य बाब आहे. पण यामुळे तुमचं सौंदर्य कमी होतं. अनेकजण चेहऱ्यावरील पुरळ किंवा पिंपल्स हाताने फोडतात.

After popping a zit to prevent scarring what should you do | पुरळ किंवा पिंपल्स फोडल्यावर चेहऱ्यावर डाग पडणे कसे रोखाल?

पुरळ किंवा पिंपल्स फोडल्यावर चेहऱ्यावर डाग पडणे कसे रोखाल?

चेहऱ्यावर पुरळ येणे ही एक सामान्य बाब आहे. पण यामुळे तुमचं सौंदर्य कमी होतं. अनेकजण चेहऱ्यावरील पुरळ किंवा पिंपल्स हाताने फोडतात. पण हे पिंपल्स किंवा पुरळ हाताने फोडल्यास त्याचे डाग चेहऱ्यावर पडतात. इतकेच नाही तर याने वेदनाही खूप होतात आणि यातून रक्तही येऊ शकतं. तुम्हाला चेहऱ्यावरील ही पुरळ दूर व्हावी आणि डागही पडू नये तर काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तज्ज्ञांनुसार, सर्वातआधी पुरळचा लाल रंग कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी त्या जागेवर कोल्ड पॅक लावा. असे केल्याने या जागेवर रक्ताचा प्रवाह कमी होईल. काळजी घ्या की, आईस बॅग २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावू नका. 

त्यानंतर त्या जागेवर बेंजोयल पेरोक्साइड लावा. हे लावल्याने त्या जागेवरील बॅक्टेरिया कमी करण्यास मदत मिळेल. याने वेदनाही कमी होतील आणि डाग कमी होण्याचीही शक्यता असते. 

हात धुवा - जर तुम्ही हात न धुताच चेहऱ्याला स्पर्श करत असाल तर यामुळे स्थिती आणखी खराब होऊ शकते. म्हणजे तुमच्या हाताने बॅक्टेरिया पसरु शकतो. ज्यामुळे चेहऱ्यावर अनेक ब्रेकआउट्स होऊ शकतात. त्यामुळे पुरळ फोडल्यानंतर हात स्वच्छ धुवा. 

त्या जागेला खाजवू नका - पुरळ फोडल्यानंतर त्या जागेवर खाज येणे सामान्य बाब आहे. पण कंट्रोल करा आणि त्या जागेवर खाजवू नका. स्पर्श करु नका. असे केल्याने तुम्हाला वेदना होऊ शकतात आणि डाग वाढू शकतात. 

खपली काढू नका - काळजी घ्या की, जर फोडलेल्या पुरळवर खपली आल्यास ती काढण्याची घाई करु नका. खपली न काढल्यास पुरळ लवकर बरी होते. खपली काढल्यास चेहऱ्य़ावर डागही पडू शकतो. 

Web Title: After popping a zit to prevent scarring what should you do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.