सुझान खान विरोधात अब्रु नुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2016 07:06 AM2016-07-09T07:06:26+5:302016-07-09T12:36:26+5:30
एका रिअल इस्टेट कंपनीचा व्यवस्थापकीय भागीदार मुदिथ गुप्ता यांनी अभिनेता ह्रतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खान विरोधात गोव्याच्या दिवाणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करुन गुन्हा दाखल केला आहे.
ए ा रिअल इस्टेट कंपनीचा व्यवस्थापकीय भागीदार मुदिथ गुप्ता यांनी अभिनेता ह्रतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खान विरोधात गोव्याच्या दिवाणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करुन गुन्हा दाखल केला आहे.
सुझान विरुद्ध याआधी ‘इएमजी प्रॉपर्टीज’कडून १.८७ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणीची एक तक्रार पणजी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना, ‘मुदिथ गुप्ता हा आपल्या एकटेपणाचा फायदा घेत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे’ असे विधान तिने केले, याचबरोबर तिने केलेल्या आणखी काही आक्षेपार्ह विधानांमुळेच तिच्याविरुद्ध अब्रुनुकसानीची तक्रार करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया गुप्तांचे वकील राजनाथ शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांकडे दिली. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत पणजी पोलिसांनी सुझान खान विरोधात तक्रार दाखल करुन घेत ‘आयपीसी कलम ४२०’ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आपल्यावर झालेले हे सर्व आरोप चुकीचे आणि मानहानीकारक आहेत असे सांगत ‘सदर कंपनीकडून माझ्यावर दबाव आणला जात आहे’, असेही सुझान म्हणाली.