वायूप्रदूषण हे मेंदूसाठीही घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2016 03:58 PM2016-09-09T15:58:10+5:302016-09-10T12:05:24+5:30
वायू प्रदूषण हे केवळ हृदय व फुप्फासाठीच नव्हे तर मेंदूसाठीही घातक आहे.
Next
त्यामध्ये म्हटले आहे की, वायू प्रदूषण हे केवळ हृदय व फुप्फासाठीच नव्हे तर मेंदूसाठीही घातक आहे. मेंदूसंबंधीच्या विविध आजार त्यापासून उद्भवतात. संशोधन टीममधील बारबरा माहेरने सांगितले की, श्वास घेताना, शरीरात जाणाºया कणांचे प्रमाण मोठे आहे. तसेच काही मेंदूपर्यतही जातात. मॅग्नेटिक प्रदूषण कण हे मेंदूमध्ये जाणाºया आवाज व संकेताला थांबवितात.
त्यामुळे आजार उद्भविण्याची मोठी शक्यता असते. स्वयंपाक करताना व वाहनातून बाहेर पडणारा धूर यामुळे ७० लाख जणांचा मृत्यू झाल्याचे डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे विकसीत व विकसनशील देशातही ही एक मोठी समस्या बनली आहे. दक्षिण आशियामधील भारत व इंडोनेशिया हे दोन्ही देश या समस्याने अधिकच प्रभावित असल्याचेही डब्ल्यूएचओच्या अहवाल म्हणतो. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्याकडे आपल्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हाच या समस्यापासून आपली सुटका होऊ शकते.