Alert : ​ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करताना ‘या’ विशेष गोष्टीकडे करु नका दुर्लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2017 09:58 AM2017-05-17T09:58:43+5:302017-05-17T15:28:43+5:30

त्या प्रॉडक्टवर एक लहानसा जार सारखे काहीतरी बनविले असते. ज्यात एक संख्यादेखील लिहिलेली असते. जाणून घेऊया या जारचा अर्थ.

Alert: Do not neglect to 'this' special thing when buying beauty products! | Alert : ​ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करताना ‘या’ विशेष गोष्टीकडे करु नका दुर्लक्ष !

Alert : ​ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करताना ‘या’ विशेष गोष्टीकडे करु नका दुर्लक्ष !

Next
िष्यात जेव्हाही तुम्ही एखादे कॉस्मेटिक खरेदी करण्यासाठी जाणार तेव्हा ते खरेदी करण्याअगोदर त्याचे लेबल वाचण्यासाठी थोडा वेळ नक्की काढा. आपणास असे वाटत असेल की, आम्ही आपणास त्याची एक्सपायरी डेट पाहावयास सांगत असू. मात्र आपला हा तर्क चुकीचा आहे. 
त्या प्रॉडक्टवर एक लहानसा जार सारखे काहीतरी बनविले असते. ज्यात एक संख्यादेखील लिहिलेली असते. जाणून घेऊया या जारचा अर्थ.
हे जार सारखे सिंबॉल हे दर्शविते की, कोणतेही प्रॉडक्ट खोलल्यानंतर आपण त्याचा वापर केव्हापर्यंत करु शकतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की, हे सिंबॉल आणि एक्सपायरी डेट एकच गोष्ट असते. एक्सपायरी डेटचा अर्थ असा की, आपण ते प्रॉडक्ट कधी पर्यंत वापरु शकतो आणि जार सारख्या सिंबॉलचा अर्थ असा की, प्रॉडक्ट खोलल्यानंतर आपण त्याला कधी पर्यंत वापरु  शकता. 
मेकअप प्रॉडक्ट खोलल्यानंतर आपणास जार मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे त्याचा वापर करायला हवा. जर जार मध्ये ‘६ एम’ असे लिहिले असेल तर याचा अर्थ आपण त्याला ६ महिन्यापर्यंत वापरू शकता. असे न केल्याने कदाचित कित्येक बॅक्टेरियांच्या संक्रमणाने आपणास इजा पोहचू शकते.  





Source : 

amarujala.com 


 

Web Title: Alert: Do not neglect to 'this' special thing when buying beauty products!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.