फेअरनेस क्रिममुळेही होऊ शकते अॅलर्जी, जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 03:48 PM2020-01-06T15:48:38+5:302020-01-06T15:49:18+5:30
जवळपास सगळ्यात स्त्रिया सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात.
जवळपास सगळ्यात स्त्रिया सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात. कारण चेहरा गोरा करण्यासाठी किंवा त्वचा मऊ होण्यासाठी वेगवेगळ्या प्रसाधनांचा वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की कॉस्मेटिकचा अतिवापर तुम्हाला महागात पडू शकतो. अनेकदा आपल्याला घरगुती उपाय म्हणजेच घरगुती पदार्थांचा वापर करून पॅक किंवा त्वचेसाठी आवश्यक असणारे जूस तयार करण्यासाठी जराही वेळ नसतो. म्हणून बाहेरच्या केमिकल्सचा वापर असलेल्या क्रिम्सचा वापर सर्वाधिक केला जातो. पण तुमची हीच सवय तुम्हाला खूप महागात पडू शकते.
यामुळे तुमच्या त्वचेवर एलर्जी येणं, त्वचा लाल होणे. काळे डाग किंवा त्वचेला काळपटपणा येत जातो. अनेकदा आपल्याला असं वाटत असतं कि वातवरणात झालेल्या बदलामुळे किंवा उन्हामुळे तसंच झोप पूर्ण न झाल्यामुळे आपला चेहरा काळा पडला आहे. पण अनेकदा असं नसून तुम्ही ज्या फेअरनेस क्रिम किंवा लोशन वापरत असता त्यामुळे चेहरा काळा पडत जातो. कारण त्या क्रिम्सचा थर त्वचेवर येत जातो आणि त्यात वापरले जात असलेल्या केमिकल्समुळे त्वचेचं नुकसान होतं.
ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये असणारे केमिकल्स चेहरा आणि आजूबाजूच्या पेशींना निष्क्रिय बनवतात. त्यातून काही पदार्थ त्वचेवर राहत असतात त्यांना लिपिड्स असं म्हणतात. रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे कि त्वचेवर खाज आणि सुज येण्यासाठी लिपिड्स कारणीभूत असतात. साइंस इम्यूनॉलजी नावाच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार त्या प्रसाधनांमधले केमिकल्समुळे खाज येणे, आग होणे, चट्टे येणे अशा समस्या उद्भवत असतात. बालसम येथे संशोधकांनी बेंजाईल आणि बेंजाइल सिनामेट यां केमिकल्सयुक्त पदार्थांना त्वचेवरील इन्फेक्शनसाठी जबाबदार ठरवलं आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानूसार जर तुम्हाला कॉस्मेटीक्सच्या वापरामुळे गंभीर समस्या उद्भवल्यास स्कीन स्पेशालिस्टकडे जाऊन त्वरित उपचार करणं गरजेचं आहे. तसंच ते उत्पादन पुन्हा न वापरणं फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणत्याही दुकानातून ब्यूटी प्रोडक्स घेत असाल तर त्याचा मागे लिहिलेले तपशील वाचून मग ते खरेदी करा. हे उत्पादन वापरल्यानंतर कोणतीही समस्या होणार नाही. तसंच त्वचेला सुट होईल याची दक्षता घेणं गरजेचं आहे.