मेहंदीमध्ये फक्त 'हा' पदार्थ एकत्र करा; म्हातारपणातही पांढरे होणार नाहीत केस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:36 PM2019-10-02T16:36:16+5:302019-10-02T16:48:12+5:30
सध्या पांढऱ्या केसांच्या समस्येने अनेकजण हैराण आहेत. साधारणतः पांढऱ्या केसांची समस्या वाढत्या वयामध्ये पाहायला मिळते. पण सध्या अनेक तरूणांचेही केस पांढरे झाल्याचे पाहायला मिळते.
सध्या पांढऱ्या केसांच्या समस्येने अनेकजण हैराण आहेत. साधारणतः पांढऱ्या केसांची समस्या वाढत्या वयामध्ये पाहायला मिळते. पण सध्या अनेक तरूणांचेही केस पांढरे झाल्याचे पाहायला मिळते. कमी वयातच केसांचं पाढरे होण्यामागे धावपळीची जीवनशैली, दिवसभराचा तणाव, चुकीचा आहार या गोष्टी कारण ठरतात. अनेकदा पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदीचा वापर केला जातो. परंतु, याचा परिणाम जास्त दिवस राहत नाही. तसेच यांमध्ये अस्तित्वात असणारे केमिकल्स केसांना नुकसान पोहोचवतात. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यासोबतच केसांचं आरोग्य राखण्यासही मदत करेल.
केसांसाठी फायदेशीर ठरणारा हा पदार्थ म्हणजे, बदामाचं तेल. हे तेल मेहंदीसोबत एकत्र केल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होते. तसेच केसांचं आरोग्य राखण्यासही मदत होते. बदामाचं तेल जेवढं आरोग्यासाठी उत्तम ठरतं तेवढचं ते, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं.
जाणून घेऊया कसा करावा या तेलाचा वापर :
साहित्य :
- मेहंदी
- बदामाचं तेल
पद्धत :
- सर्वात आधी एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मेहंदी पावडर आणि बदामाचं तेल एकत्र करून मंद आचेवर शिजवून घ्या.
- मिश्रण व्यवस्थित एकजीव करून त्याची पेस्ट तयार करा.
- गॅस बंद करून पेस्ट थंड करून घ्या.
असा करा वापर...
तयार पेस्ट केसांना व्यवस्थित लावा आणि कमीत कमी 35 ते 40 मिनिटांसाठी तशीच ठेवा. जेव्हा हे मिश्रण सुकेल तेव्हा पाण्याने व्यवस्थित केस धुवून घ्या. 2 आठवड्यातून हा हेअर पॅक केसांना लावा. यामुळे तुमचे केस मजबुत, दाट आणि काळे होण्यास मदत होते.
केसांसाठी बदामाचं तेल ठरतं फायदेशीर...
केस गळण्यापासून रोखण्यासाठी आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी किंवा केसांच्या समस्यांसाठी बदामाचं तेल फायदेशीर ठरतं. तसेच बदामाच्या तेलाचा वापर केल्याने स्काल्पशी संबंधित समस्यांपासून सुटका होते. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन ई केसांच्या वाढिसाठी मदत करतं. एवढचं नाहीतर हे केसांना सॉफ्ट आणि शायनी करण्यासाठीही मदत करतं.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)