तुरटीचा वापर करून लगेच दूर होतील केसांच्या या 3 समस्या, सगळे केमिकल प्रोडक्ट विसराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 02:14 PM2024-09-17T14:14:55+5:302024-09-17T14:15:35+5:30

महत्वाची बाब म्हणजे तुरटीने केवळ त्वचेच्या नाही तर केसांच्याही समस्या दूर केल्या जाऊ शकतात. त्यात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Alum or fitkari for hair how to use alum for hair care | तुरटीचा वापर करून लगेच दूर होतील केसांच्या या 3 समस्या, सगळे केमिकल प्रोडक्ट विसराल!

तुरटीचा वापर करून लगेच दूर होतील केसांच्या या 3 समस्या, सगळे केमिकल प्रोडक्ट विसराल!

Hair Care: तुरटीचा वापर वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. पण लोकांना याबाबत फार माहिती नसते. आधी जेव्हा आफ्टर शेव्ह किंवा इतर क्रीम नव्हते जेव्हा तुरटीचा वापर त्वचा क्लीन करण्यासाठी आणि इन्फेक्शन दूर करण्यासाठी केला जात होता. महत्वाची बाब म्हणजे तुरटीने केवळ त्वचेच्या नाही तर केसांच्याही समस्या दूर केल्या जाऊ शकतात. त्यात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुरटीचा वापर करून केस मजबूत, अधिक काळे कसे करता येईल हे जाणून घेऊ....

केस वाढवण्यासाठी...

केसांची वाढ करण्यासाठी तुरटीचा वापर फार फायदेशीर मानला जातो. यासाठी तुरटीचं पावडर तयार करा आणि खोबऱ्याच्या तेलात ते मिक्स करून केसांवर लावा. या तेलाने डोक्याच्या त्वचेवर हलक्या हातान मालिश करा. रात्रभर हे तेल केसांना असंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस शाम्पूने धुवा. काही दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला फरक दिसून येईल. 

पांढरे केस पुन्हा होतील काळे

आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे कमी वयातच लोकांचे केस पांढरे होतात. अशात ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केमिकल्सऐवजी तुरटीचा वापर करू शकता. यासाठी तुरटीचं पावडर कलौंजीच्या तेलात मिक्स करा. कलौंजीला इंग्रजीमध्ये Nigella Sativa असं म्हणतात. ही एक औषधी वनस्पती आहे जी मसाल्यांमध्ये वापरली जाते. कलौंजीला Seeds Of Blessings असंही म्हटलं जातं कारण अनेक आजारांवर या बीया रामबाण उपाय आहेत. या तेलात तुरटी टाकून याने डोक्याच्या त्वचेची मालिश करा. असं केल्याने डोक्यात ब्लड फ्लो वाढतो आणि केसांची समस्या दूर होते.

कोंडा होईल दूर

उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने केस चांगल्या पद्धतीने स्वच्छ होत नाहीत. ज्यामुळे केसांमध्ये भरपूर कोंडा होतो. अशात तुरटीचं पावडर तयार करा ते थोडं पाणी लिंबाच्या रसात टाका. याने डोक्याच्या त्वचेची मालिश करा. असं केल्याने केसांमधील कोंडा दूर होईल. 

Web Title: Alum or fitkari for hair how to use alum for hair care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.