मेहंदीचा रंगच खुलवत नाही तर केसातील उवा आणि खाजही दूर करतं हे तेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:11 PM2019-05-09T12:11:30+5:302019-05-09T12:17:12+5:30

या तेलाचा वापर अनेकजण मेहंदीचा रंग आणखी गर्द करण्यासाठी किंवा गुडघे दुखी दूर करण्यासाठी करतात.

Amazing benefits of eucalyptus oil for hair | मेहंदीचा रंगच खुलवत नाही तर केसातील उवा आणि खाजही दूर करतं हे तेल!

मेहंदीचा रंगच खुलवत नाही तर केसातील उवा आणि खाजही दूर करतं हे तेल!

googlenewsNext

(Image Credit : gumtree.sg)

निलगिरी तेलाबाबत तुम्ही ऐकलं असेलच. या तेलाचा वापर अनेकजण मेहंदीचा रंग आणखी गर्द करण्यासाठी किंवा गुडघे दुखी दूर करण्यासाठी करतात. निलगिरीचं तेल हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी फायदेशीर होतात. तसेच निलगिरीचं तेल हे  केसांसाठीसाठी अमृतासमान मानलं जातं. या तेलाने केसांच्या मुळात होणाऱ्या इन्फेक्शनपासून आणि उवांपासून सुटका देतं. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. 

(Image Credit : Healthline)

उवांचा नायनाट

निलगिरी तेलात खटमल आणि उवांचा नायनाट करण्याचे खास गुण मिळतात. पूर्वी केसांमध्ये उवा झाल्यावर या तेलाचा कीटकनाशक म्हणूण वापर केला जात होता. हे तेल केसांना काही वेळासाठी लावून ठेवा, नंतर शॅम्पू करा. उवा हळूहळू मरतील. तसेच केसांना आधीपेक्षा अधिक चमक दिसेल. 

केसाच्या मूळांची स्वच्छता

निलगिरीच्या तेलाने केसांच्या मूळांची स्वच्छता करण्यासोबतच डोक्याच्या त्वचेवर ओलावा आणि केस वाढवण्यास मदत होते. हे तेल शॅम्पूसोबत मिश्रित करून लावल्याने केसांच्या मूळात खाज येण्याची समस्या होत नाही. यासाठी तुम्ही वापरता त्या शॅम्पूमध्ये निलगिरी तेल टाकून केस धुवावे. 

केसांना नवी चमक

प्रदूषण आणि गरमीमुळे केसांची मूळं कमजोर होतात. यामुळे केसगळतीची समस्या होते. तसेच केसांची नैसर्गिक चमकही दूर होऊ लागते. त्यामुळे अनेक तज्ज्ञ केसांचा चमकदारपणा परत मिळवण्यासाठी निलगिरीचं तेल वापरण्याचा सल्ला देतात. काही तास केसांना हे तेल लावून ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस धुवावे. शायनी आणि सिल्की केसांसाठी २ चमचे निलगिरी तेलात २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिश्रित करून केसांना लावा आणि मसाज करा. याने तुम्हाला फरक बघायला मिळेल.

घरीच तयार करा तेल

१) निलगिरीच्या झाडांची पाने जमा करा आणि ती वाळवून घ्या.

२) पानं वाळल्यानंतर त्यांचे तुकडे करा. 

३) गॅसवर एक भांड ठेवून त्यात खोबऱ्याचं, जोजोबा ऑइल, ऑलिव्ह ऑइल किंवा कॅस्टर ऑइल टाका आणि त्यात निलगिरीची पाने टाका. 

४) आता भांड्यावर झाकन ठेवा आणि सहा तास तसंच राहू द्या. 

५) नंतर तेल थंड होऊ द्या आणि गाळणीच्या माध्यमातून गाळून घ्या. 

६) हे तेल एअरप्रूफ डब्यात टाकून थंड ठिकाणावर ठेवा. तुमचं निलगिरी तेल तयार आहे. 

 

Web Title: Amazing benefits of eucalyptus oil for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.