पिंपल्स, डाग, डार्क सर्कल, सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हा' खास घरगुती उपाय ठरेल बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 11:49 AM2019-10-09T11:49:42+5:302019-10-09T12:06:48+5:30

त्वचेसंबंधी समस्या कमी करण्यासाठी अनेकजण ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण त्यात असलेल्या केमिकल्समुळे त्वचेचं नुकसान होतं.

Amazing benefits of milk and honey cleanser | पिंपल्स, डाग, डार्क सर्कल, सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हा' खास घरगुती उपाय ठरेल बेस्ट!

पिंपल्स, डाग, डार्क सर्कल, सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हा' खास घरगुती उपाय ठरेल बेस्ट!

googlenewsNext

(Image Credit : activenhealth.com)

त्वचा चांगली राहण्यासाठी त्वचेची नियमित काळजी घेणं फार गरजेचं असतं. यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतातच. पण तरी सुद्धा लोकांना त्वचेसंबंधी समस्या होतात जसे की, पिंपल्स, डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स आणि लालसरपणा. या समस्यांमागे वेगवेगळी कारणे असतात जसे की, अनहेल्दी आहार, खराब दिनचर्या,  प्रदूषण किंवा धूळ.

या त्वचेसंबंधी समस्या कमी करण्यासाठी अनेकजण ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण त्यात असलेल्या केमिकल्समुळे त्वचेचं नुकसान होतं. अशात दूध आणि दह्याचं क्लिंजर म्हणजेच त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे काही पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतं. याने त्वचेला पोषण तर मिळतच, सोबतच त्वचा चांगल्याप्रकारे मॉइश्चराइजही केली जाते. चला जाणून घेऊ दूध आणि मधाचं क्लिंजर कसे फायदेशीर ठरतात.

त्वचा उजळते

दूध आणि मधात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असल्याकारणाने याने त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा उजळते. त्यासोबतच दूध आणि मधाच्या क्लिंजरने त्वचेवरील टॅनिंगही कमी केली जाते. 

फाटलेल्या ओठांसाठी

(Image Credit : scienceabc.com)

ओठ रखरखीत आणि निर्जिव झाल्याने फाटू लागतात. ज्यामुळे वेदनाही होतात आणि ओठांवर सूजही येते. अशात दूध आणि मधाच्या क्लिंजरचा वापर तुम्ही ओठांवर करू शकता. याने ओठ हायड्रेटेड राहतात.

त्वचेवरील डाग कमी करतं

ह्यूमेक्टेंट असल्याकारणाने दूध आणि मधाचं क्लिंजर त्वचेवरील डाग दूर करण्यास फायदेशीर ठरतात. तसेच याने त्वचा मुलायम देखील होते. दूध आणि मधामुळे त्वचेवरील पिगमेंटेशनही दूर होतात.

वाढत्या वयाची लक्षणे कमी होतात

(Image Credit : marketwatch.com)

दूध आणि मधाच्या क्लिंजरमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे त्वचेला लवचिक ठेवतात आणि वाढत्या वयाचे संकेत चेहऱ्यावर दिसू देत नाहीत. याने चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात. 

पिंपल्स दूर करण्यासाठी

दूध आणि मधाच्या क्लिंजरमध्ये मॉइश्चरायजिंगचे गुण असतात, जे त्वचेवर  होणारे पिंपल्स आणि डाग कमी करतं. त्यासोबतच त्वचेला पोषणही मिळतं.

दूध आणि मधाचं क्लिंजर हे त्वचेसाठी फायदेशीर असतं, कारण याने त्वचेला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. आणि त्वचा रखरखीत आणि निर्जिव होणंही टळतं.


Web Title: Amazing benefits of milk and honey cleanser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.