'या' फळांचा करा आहारात समावेश; चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं होतील दूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 08:26 PM2019-04-09T20:26:33+5:302019-04-09T20:27:03+5:30

कमी वयातच अनेकांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये थोडे बदल करा. वाढत्या वयाची लक्षणं सर्वात आधी चेहऱ्यावर दिसून येतात.

Anti ageing fruits eat these fruits to curb ageing problem | 'या' फळांचा करा आहारात समावेश; चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं होतील दूर 

'या' फळांचा करा आहारात समावेश; चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं होतील दूर 

Next

कमी वयातच अनेकांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये थोडे बदल करा. वाढत्या वयाची लक्षणं सर्वात आधी चेहऱ्यावर दिसून येतात. अनेकदा यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सही कारणीभूत ठरतात. त्यामुळे शक्यतो बाजारात मिळणाऱ्या केमिलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करणं टाळावं. त्याऐवजी हेल्दी डाएट उत्तम उपाय ठरतो. तुम्ही आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करता त्यावरूनही तुमच्या त्वचेचं तारूण्य अवलंबून असतं. त्यामुळे त्वचा चिरतरूण ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. काही फळं अशी असतात ज्यांचा आहारात समावेश केल्याने वाढत्या वयाची लक्षणं कमी होतात. यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे त्वचा चमकदार करण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया वाढत्या वयाची लक्षणं दिसू नये म्हणून कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत...

किवी

किवीमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यास मदत करतात. हे फळं त्वचेसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. सुरकुत्या, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी यामध्ये असणारं व्हिटॅमिन-सी आणि ई फायदेशीर ठरतं. 

स्ट्रॉबेरी 

स्ट्रॉबेरी सारख्या बेरीजमध्ये अॅन्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. यांच्या नियमित सेवनाने वाढत्या वयाच्या लक्षणांना तम्ही कमी करू शकता. हे त्वचेमधील कोलेजनचं उत्पादन वाढविण्यासाठी मदत करतं. त्यामुळे स्ट्रॉबेरी त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असते. 

सफरचंद

आपण अनेकदा ऐकतो की, ऍन अ‍ॅपल अ डे, किप्स डॉक्टर अवे. सफरचंद आरोग्यासाठी जसं फायदेशीर ठरतं तसचं ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी आणि ग्लो वाढविण्यासाठी मदत होते. यामध्ये असणारे एंजाइम शरीर आणि त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठी मदत करतात. 

पपई

पपई त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असते. हे फळं त्वचेचा रंग उजळवण्यासोबतच टॅनिंग दूर करण्यासाठीही मदत करतं. हे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकतं. पपईचं दररोज सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन्स, पिंपल्स यांसारख्या समस्या दूर होतात. 

कलिंगड

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. हे त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळ वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी कलिंगड खाणं उत्तम ठरतं. यामध्ये आवश्यक ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. जे त्वचेला पोषक तत्व देण्यासाठी फायेदशीर ठरतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Anti ageing fruits eat these fruits to curb ageing problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.