​अँटिबायोटिक्समुळे वाढतो संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2016 02:27 PM2016-05-03T14:27:50+5:302016-05-03T19:57:50+5:30

प्रतिजैविकांमुळे आतड्यातील रोगकारक जंतू जागृत होऊन पोटाचे आजार व डायरिया होण्याचा धोका संभावतो.

Antibiotics increase the risk of infection | ​अँटिबायोटिक्समुळे वाढतो संसर्गाचा धोका

​अँटिबायोटिक्समुळे वाढतो संसर्गाचा धोका

Next
क्टेरियापासून होणाऱ्या संसर्गावर इलाज म्हणून प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) उपाय करण्यात येतो. मात्र, याच प्रतिजैविकांमुळे आतड्यातील रोगकारक जंतू जागृत होऊन पोटाचे आजार व डायरिया होण्याचा धोका संभावतो.

रिसर्चमध्ये असे दिसून आले की, अँटिबायोटिक्समुळे आॅक्सिजन पातळी व फायबर प्रणाली विस्कळित होऊन आतड्यातील रोगजंतूची वाढ होते.

या शोधामुळे भविष्यात प्रतिजैविकांच्या दूष्परिणामांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदा होणार आहे. आतड्यांत असणारे चांगले जंतू कशाप्रकारे अपायकार बॅक्टेरियांना अटोक्यात ठेवतात आणि अँटिबायोटिक्स उपचारांमुळे कशाप्रकारे रोगकारक जंतुची वाढ होते याविषयी पुरेसे संशोधन यापूर्वी करण्यात आले नव्हते.

भाज्यांचे विघटन करून मिळवण्यात आलेल्या फायबरपासून ब्युटेराईट तयार करणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांना प्रतिजैविके नष्ट करतात. फायबरचे पचन करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे पेशींचे आॅक्सिजन शोषण्याचे प्रमाण कमी होते.

त्यामुळे आतड्यांत आॅक्सिजनची पातळी वाढते आणि सॅल्मोनेल्ला नावाचे रोगकारण जंतू वाढतात, अशी माहिती प्रमुख संशोधक अँड्रीएस बॉमलर यांनी दिली. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया डेव्हिस हेल्थ सिस्टम येथे ते प्राध्यापक आहेत.

Web Title: Antibiotics increase the risk of infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.