​डिप्रेशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2016 09:56 AM2016-05-15T09:56:29+5:302016-05-15T15:26:29+5:30

अ‍ॅक्झायटी आणि डिप्रेशनसारख्या समस्यांनापासून मुक्ती मिळवण्यासाठी संशोधकांनी एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.

App to get rid of depression | ​डिप्रेशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी अ‍ॅप

​डिप्रेशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी अ‍ॅप

Next
लती जीवनशैली आणि वाढता कामाचा व्याप पाहता नैराश्य, डिप्रेशन, उदासिनता, खिन्नता हे शब्द फार कॉमन झाले आहेत. जीवनाच्या शर्यतीमध्ये जो तो पुढे जाण्यासाठी धडपड करतोय.

त्यामुळे कमी वयातच लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. यावर एक उपाय म्हणून इंग्लंडमधील संशोधकांनी एका खास मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे.

अ‍ॅक्झायटी आणि डिप्रेशनसारख्या समस्यांनापासून मुक्ती मिळवण्यासाठी संशोधकांनी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिएरल थेरपीचा (सीबीटी) वापर करून एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.

जीवनाचा दृष्टीकोन आणि वर्तन बदलून आपल्या सर्व अडचणी सोडविण्याची पद्धत म्हणजे ‘सीबीटी’. त्याचा वापर करून ‘कॅच इट’ नावाचे हे अ‍ॅप मानसशास्त्रीय धोरणांद्वारे यूजरच्या मानसिक आरोग्याची काळजी घेते.

यूजरच्या मनाचा कल (मूड) ओळखून हे अ‍ॅप त्यांच्याशी निगडित विचार व कल्पनांना अधिक चांगल्या रितीने समजावण्याचा प्रयत्न करते. त्यातील सकारात्मक विचार समोर करून यूजरला त्यावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडते. दैनंदिन रोजनिशीद्वारे यूजरच्या मूडचा अंदाज घेतला जातो. 

लिव्हरपूल विद्यापीठातील प्राध्यापक यांनी माहिती दिली की, ‘कॅच इट’ अ‍ॅपच्या फायद्यांचा आणि परिणामकारकतेचा आम्ही पुरेपूर अभ्यास केला आहे. यूजरच्या नकारात्मक व सकारात्मक मूडनुसार त्यांना आवश्यक ते बदल सुचवण्याचे काम हे अ‍ॅप करते. या संशोधनाचे सुरुवातीचे निष्कर्ष ब्रिटिश जर्नल आॅफ साईक ओपनमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. 

Web Title: App to get rid of depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.