चमकदार-मुलायम केसांसाठी वापरा केळ्याची पेस्ट; होतील फायदेच फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 01:31 PM2019-05-18T13:31:11+5:302019-05-18T13:31:34+5:30
तुम्ही कधी केसांना केळ्याची पेस्ट लावली आहे का? कदाचित नाही. ज्याप्रकारे केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्याचप्रमाणे केळी केसांचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतात.
तुम्ही कधी केसांना केळ्याची पेस्ट लावली आहे का? कदाचित नाही. ज्याप्रकारे केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्याचप्रमाणे केळी केसांचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतात. जर आतापर्यंत तुम्ही केसांसाठी केळ्याची पेस्ट वापली नसेल तर आता एकदा तरी वापरून पाहा. केसांच्या मजबुतीसाठी आणि केस चमकदार करण्यासाठी मदत होते. केळ्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न असतं. ही सर्व पोषक तत्व केस वाढविण्यासाठी मदत करतात. केसांना केळं लावल्याने पोषण मिळतं. जाणून घेऊया केसांना केळ्याची पेस्ट लावल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत...
केसांच्या मजबुतीसाठी
जेव्हा आपल्या डोक्याची त्वचा आणि केस डिहायड्रेट होतात. तसेच धूळ, माती आणि प्रदूषणामुळे डोक्याची त्वचा शुष्क होते आणि केसांमध्ये कोंडा होतो. ज्यामुळे केस गळण्यास सुरुवात होते. या सर्व समस्यांवर केळ अत्यंत गुणकारी ठरतं. यामध्ये खनिज तत्व आणि व्हिटॅमिन्स असतात, जे डोक्याची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी मदत करतात. यामध्ये आढळून येणारे एमोलिएंट केस हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं.
केस होतात मुलायम
केळ्यामध्ये असलेलं नॅचरल ऑइल कोरड्या केसांची समस्या दूर करतं आणि केस मुलायम करतं. तसेच ही पेस्ट केस सरळ करण्यासाठीही मदत करते. यासाठी सर्वात आधी दोन केळी घेऊन ती स्मॅश करा आणि त्यानंतर यामध्ये मुलतानी माती किंवा लिंबाचा रस एकत्र करा. तयार पेस्टा आपल्या केसांवर लावा. हे 40 मिनिटांसाठी सुकण्यासाठी ठेवा त्यानंतर पाण्याने धुवून टाका.
केस चमकदार होण्यासाठी
वातावरणातील बदल आणि प्रदूषणामुळे केसांचं आरोग्य बिघडतं. केसांवर केळ्याची पेस्ट लावल्याने यामध्ये असलेलं फॉलिक अॅसिड केसांना चमकदार करण्यासाठी मदत करतं. त्यासाठी एका बाउलमध्ये केळी स्मॅश करून घ्या. यामध्ये अंड आणि ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट केसांना लावून 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा. सुकल्यानंतर पाण्याने धुवून घ्या. यामुळे केस चमकदार होण्यास मदत होते.
केसांची वाढ होण्यासाठी
केळी केसांची वाढ होण्यासाठी मदत करतात. ही पेस्ट केसांना लावल्याने केस गळणं कमी होतं. एक केळं स्मॅश करून त्यामध्ये दही एकत्र करा आणि पेस्ट करून घ्या. त्यानंतर 15 मिनिटांसाठी तसचं ठेवून केस पाण्याने धुवून घ्या.
केसांना मॉयश्चराइज्ड करा
कोरडे आणि शुष्क केसांची देखभाल करणं अत्यंत अवघड काम आहे. अशातच केळ्याचा उपयोग करा. त्यासाठी मधासोबत स्मॅश केलेली केळी एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर हे केसांवर लावा. सुकल्यानंतर धुवून टाका. यामुळे केस मुलायम आणि रेशमी होतात.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतीलच असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.