बटाट्याचा रस अशा पध्दतीने चेहऱ्याला लावा, विसराल महागडे क्रीम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:40 PM2021-06-10T15:40:34+5:302021-06-10T15:41:22+5:30
बटाटा ही सर्वांची आवडती भाजी. बटाटा जितका आपल्या शरीरासाठी फायदेशीर तेवढाच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
बटाटा ही सर्वांची आवडती भाजी. बटाटा जितका आपल्या शरीरासाठी फायदेशीर तेवढाच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आपण घराच्या घरी बटाट्याचा फेस मास्क तयार करून त्वचेला लावू शकतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास होतात. पाहुयात असे कोणते मास्क आहेत ते...
1. कोरडी त्वचा असल्यास
साहित्य
1 बटाटा
1 चमचा बेसन
1 चमचा कोरफड जेल
तयार करण्याची पध्दत
बटाटा धुवून तो मिक्सरमध्ये बारीक करा. त्याचा रस काढा. वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बटाट्याच्या रसात मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहर्यावर आणि मानेवर लावा. पेस्ट सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. बटाटे फायबर, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोहयुक्त असतात. सुरकुत्या, कोरडी त्वचा, लालसरपणा आणि काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस आपण चेहऱ्याला लावू शकता.
2. डॉर्क सर्कल्स असल्यास
साहित्य
2 कापसाचे गोळे
बटाटा रस
काकडीचा रस
तयार करण्याची पध्दत
यासाठी आपल्याला बटाट्याच्या रसामध्ये काकडीचा रस समान प्रमाणात मिसळा. कापसाच्या सहाय्याने डॉर्क सर्कल्सवर लावा. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटांनंतर धुवा. यामुळे डोळ्यांखालील डॉर्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावली पाहिजे.
3. चेहऱ्यावरील मुरूम
साहित्य
1 बटाटा
1 चमचे मध
2 चमचे कोरफड जेल
तयार करण्याची पध्दत
सर्व प्रथम मिक्सरमध्ये बटाटे बारीक करून पेस्ट तयार करा आणि सर्व गोष्टी मिक्स करा.
या सर्व गोष्टी मिक्स केल्यानंतर जाड पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावा आणि हे मिश्रण कोमट पाण्याने सुमारे 20 मिनिटांनी धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावला तर आपल्या त्वचेसाठी ते फायदेशीर ठरेल.