मेकअपशिवाय दिसायचंय खास?; 'या' टिप्स करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:34 AM2019-10-25T11:34:07+5:302019-10-25T11:40:42+5:30
मुली सुंदर दिसण्यासाठी अनेक उपाय करतात. तसेच बाजारात मिळणाऱ्या अनेक महागड्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. यामुळे त्यांना अनेक स्किन प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो.
मुली सुंदर दिसण्यासाठी अनेक उपाय करतात. तसेच बाजारात मिळणाऱ्या अनेक महागड्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. यामुळे त्यांना अनेक स्किन प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागतो. त्यामुळे चेहऱ्याचा लूक बिघडतो. अशातच आपलं सौंदर्य जपण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ज्यामुळे तुम्ही मेकअप न करताच तुमचं सौंदर्य जपू शकता.
आहारावर लक्ष द्या
- फळं आणि भाज्यांसोबत ड्रायफ्रुट्सचाही आहारात समावेश करा.
- कमीत कमी 8 ग्लास पाणी प्या.
- व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असलेल्या फळांचं सेवन करा.
योग्य स्किन प्रोडक्टचा करा वापर
- आपल्या स्किन टाइपनुसार स्किन प्रोडक्ट्सचा वापर करा.
- जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचेवर क्रिमऐवजी जेल मॉयश्चरायझरचा वापर करा.
- शक्य असेल तर मेकअप लिपस्टिक ऐवजी लिपग्लॉज किंवा लिपबाम वापरू शकता.
सोडा आणि कोल्ड्रिंकऐवजी नॅचरल ज्यूसचं सेवन करा...
- सोडा आणि कोल्ड्रिंकचं सेवन कमी करा कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर असते. त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात.
उशीचा कव्हर स्वच्छ करा
उशी किंवा बेडशीट स्वच्छ ठेवा. त्यामुळे त्वचेवर चांगला परिणाम होतो.
22 दिवसांनी करा फेशिअल
सतत बाहेर फिरल्यामुळे अनेकदा प्रदूषणाचा सामना करावा लागतो. अशातच 22 दिवसांनी फेशिअल करणं फायदेशीर ठरतं.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)