आपणही डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त आहात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 06:16 AM2017-11-27T06:16:16+5:302018-06-23T12:03:19+5:30
पुरुषांच्या त्वचेच्या प्रकारानुसार पिंपल्स, काळे डाग आदी समस्या उद्भवू शकतात. वेळीच काळजी घेतली नाही तर ही समस्या बिकट होऊन चेहऱ्याची विद्रुपता वाढू शकते.
Next
आ बहुतांश पुरुष आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहावे, यासाठी प्रयत्न करताना दिसतात. पुरुषांच्या त्वचेच्या प्रकारानुसार वातावरणाचा परिणाम किंवा अन्य काही कारणाने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यात पिंपल्स, काळे डाग आदी समस्या उद्भवू शकतात. वेळीच काळजी घेतली नाही तर ही समस्या बिकट होऊन चेहऱ्याची विद्रुपता वाढू शकते.
सौंदर्य आणि ते खुलविण्यासाठी मेकअप किंवा सौंदर्य सल्ला हे समिकरण मुलींसाठीच अधिक लागू होते. मात्र याचा अर्थ असा नाही की पुरुषांना याची गरजच नसते. पुरुषांच्या त्वचेलाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डोळ्याखालील काळे वर्तुळ यापैकीच एक समस्या आहे. पुरुष याकडे जास्त लक्ष देत नाही. यामुळे पुढे ही एक मोठी समस्या बनू शकते. जाणून घ्या का येतात हे काळे वर्तुळ आणि त्यावर उपाय काय?
दिवसरात्र स्क्रीनसमोर बसल्याने, रात्री झोप बरोबर न झाल्याने, सिगारेट ओढल्याने डोळ्याखाली काळे वर्तुळ येतात. त्यासाठी दररोज दहा ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील हानिकारक टॉक्झिन्स बाहेर पडतील. फ्रीझरमध्ये रात्री एक चमचा बर्फ जमा व्हायला ठेवा. सकाळी उठून हा चमचा डोळ्याखाली लावा. त्यानंतर थोडे फेस क्रीम लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळून काळे वर्तुळ कमी होईल. जास्त उन्हात बाहेर पडू नका. निघायचे असल्यास सनस्क्रीन लावून सनग्लासेस लावून बाहेर पडा. डोळ्यावर बटाटा किंवा काकडीची चकती ठेवणे डोळ्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. वापरलेली टी बॅग किंवा हर्बल चहा डोळ्यांवर ठेवूनही डोळ्यांना आराम मिळतो. याव्यतिरिक्त दररोज आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.
Also Read : नेहमी तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही !
: Beauty : चेहरा धुताना पुरुषांकडून होतात ‘या’ चुका !