रात्री झोपताना तुम्ही सुद्धा 'ही' मोठी चूक करता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:33 PM2019-01-24T12:33:24+5:302019-01-24T12:36:37+5:30
काही लोक पायजामा परिधान करून झोपतात तर काही लोक शॉर्ट्स-टीशर्ट्स किंवा लूंगी परिधान करून झोपतात.
काही लोक पायजामा परिधान करून झोपतात तर काही लोक शॉर्ट्स-टीशर्ट्स किंवा लूंगी परिधान करून झोपतात. तसेच काही लोक सर्व कपडे काढून झोपतात. पण आता प्रश्न हा पडतो की, अंडरवेअर परिधान करून झोपणे आरोग्यासाठी चांगलं आहे की नुकसानकारक?
नुकसानकारक आहे 'ही' सवय
जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात रात्री पायजामा आणि उन्हाळ्यात रात्री अंडरवेअर परिधान करून झोपतात. पण एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की, जर तुम्ही अंडरवेअर परिधान करून झोपत असाल तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री निवस्त्र झोपणे अधिक फायदेशीर असतं. कारण या अंगांना सतत कपडयाने झाकून ठेवल्याने इन्फेक्शनचा धोका असतो. असे केल्याने घाम येणाऱ्या शरीरात बॅक्टेरियाला जास्त पुरक वातावरण मिळतं.
सतत कपडे अंडरवेअर परिधान करून राहिल्याने त्या जागेवर येणारा घाम सुकत नाही. त्या जागेवर नेहमी ओलावा राहतो आणि बॅक्टेरियांना तिथे वाढण्यास संधी मिळते. याने स्कीन इन्फेक्शनसोबतच, खाज, चिडचिड वाढते. महिलांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असते. याचा प्रभाव त्यांचा मासिक पाळीवरही पडतो. त्यामुळे एक्सपर्ट्स सांगतात की, जे लोक रात्री पूर्णपणे कपडे काढून झोपू शकत नाहीत त्यांनी सैल कपडे परिधान करून झोपावे.
काही रिसर्चमधून वेगवेगळी मतं समोर आली आहेत. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, टाइट किंवा लूज अंडरवेअर परिधान केल्याने काहीही फरक पडतो. टाइट अंडरवेअर परिधान केल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता प्रभावित होते.
एका सर्व्हेनुसार, ब्राझीलमध्ये १८ टक्के महिलाच अंडरवेअर परिधान करून झोपातात. ही आकडेवारी ब्रिटेनच्या आकडेवारीच्या तुलनेत कमी आहे.