सुंदर त्वचेसोबतच मनही शांत ठेवायचं असेल तर करा अरोमा थेरपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:15 PM2019-01-28T12:15:16+5:302019-01-28T12:18:13+5:30
जर तुम्हाला तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यायची असेल तर तुम्ही अरोमाथेरपी करू शकता.
जर तुम्हाला तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यायची असेल तर तुम्ही अरोमाथेरपी करू शकता. तुळस, गुलाब आणि जॅसमिनसारख्या तेलांच्या मदतीने ही थेरपी केली जाते. या थेरपीमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक असा दुहेरी फायदा मिळतो.
प्रेशर पॉइंट्स
अरोमाथेरपीमध्ये प्रेशर पॉइंट्सची मसाज केली जाते. ज्यात या पॉइंट्सना आराम मिळतो. तळपाय आणि हातांचे प्रेशर पॉइंट्स दाबल्याने संपूर्ण शरीराला आराम मिळतो. तसेच या तेलांमुळे त्वचेचा कोरडेपणा, रखरखीतपणा, डॅंड्रफ सारख्या समस्याही दूर होतात.
ड्रायनेस आणि डलनेस
या थेरपीच्या मदतीने तुमचं सौंदर्य आणखी खुलवलं जाऊ शकतं. यानंतर त्वचेमध्ये एक खासप्रकारचा सॉफ्टनेस येतो. त्वचेसाठी या थेरपीमध्ये तुम्ही मॉइश्चरायजिंग लोशन, क्लीनजिंग क्रीम आणि दुधाचाही वापर करू शकता. जर तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेल कमी असेल तर लॅंग लॅंग, जरेनियम, रोज कॅमोमील, बेनजोइन, जॅसमीन तेल मिश्रित करुन लावू शकता.
थंड्या किंवा गरम पाण्याची मसाज
या थेरपीमध्ये उपचारासाठी वेगळं तेल असतं. जर तुम्हाला टेन्शन फ्रि व्हायचं असेल तर लॅवेंडर आणि रोजमेरीचं तेल फायदेशीर ठरेल. तेच मूड फ्रेश करायचा असेल तर वेगळ्या तेलाचा वापर करू शकता. याची खासियत म्हणजे या थेरपीसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलामुळे आजारांशी लढण्याची क्षमताही वाढते.
त्वचेनुसार वेगळं तेल
वेगवेगळ्या त्वचेसाठी वेगवेगळं तेल वापरलं जातं. म्हणजे संवेदनशील त्वचेसाठी कॅमोमील, रोज, नेरोली तेल वापरलं जातं. नॉर्मल त्वचेसाठी चंदन तेल, लॅवेंडर तेल आणि रोज तेलाचा वापर केला जातो. हे वेगवेगळे किंवा एकत्र करूनही वापरले जाऊ शकतात.