रेजरमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वापरा 'या' टीप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:39 PM2019-11-20T15:39:38+5:302019-11-20T16:07:00+5:30
साधारणपणे आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया आणि मुली पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करतात.
साधारणपणे आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया आणि मुली पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करतात.पण अनेक स्त्रिया ह्या वॅक्सींग करताना होणारा त्रास, वेदना टाळण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी वॅक्स करण्याच्या ऐवजी रेजरचा वापर करतात. शेविंग करताना रेजरचा वापर केल्यास त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे स्त्रियांनी शेविंग करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. शेविंग करताना काही चुका केल्यास त्वचेला होणारे नुकसान हे मोठे असते.
शेविंग करताना या चुका टाळायला हव्यात
१) क्रीमचा वापर न करणे
रेजरने शेविंग करण्याआधी क्रीम न लावल्यास त्वचेचे फार नुकसान होऊ शकते. त्वचा लाल होणे, काळे डाग पडणे, सूज येणे यांसारख्या त्वचेशी निगडीत समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
(Image credit = daily mail online)
२) डिस्पोजेबल रेजरचा वापर करणे
अनेकदा स्त्रिया कमी दरात मिळणाऱ्या रेजरचा वापर करतात. त्यामुळे त्वचा कोरडी आणि कडक होऊ शकते. त्वचेला मऊ ठेवण्यासाठी रेजरचा वापर वारंवार करू नका. त्वचेच्या संवेदनशील भागांवरील केस काढण्यासाठी चांगल्या दर्जाच्या रेजरचा वापर करा. अन्यथा त्वचा काळी पडण्याचा धोका असतो. त्यामुळे धार खराब झालेल्या रेजरचा वापर करू नये.
३) केसांच्या वाढीची दिशा न पाहता रेजर वापरणे
केसांच्या वाढीच्या विरूध्द दिशेने केस काढण्यासाठी रेजरचा वापर करावा. अन्यथा केस उलटसूलट दिशेने येतात. अनेकदा वेळेअभावी मुली घाईघाईत रेजर फिरवतात. परिणामी त्याभागावर येणारे केस हे तुलनेने रखरखीत असतात. आणि त्याभागातील त्वचेला काळपटपणा येतो.तसेच पुळ्या देखील येतात.